Eknath Shinde : एका आमदारामुळे शिंदे सरकार धोक्यात ? ; कोश्यारींच्या निर्णयाकडे लक्ष

Latabai Sonawane News : सोनवणे यांच्या जातप्रमाणपत्राची राष्ट्रीय न्यायाधिकरण समितीकडून चौकशी सुरू आहे. त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.
 lata sonawane, eknath shinde
lata sonawane, eknath shindesarkarnama

Latabai Sonawane News : शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत पन्नास आमदार आहेत. सरकार टिकवण्यासाठी त्यांच्यासाठी एक-एक आमदार महत्वाचा आहे. अशातच आता शिंदे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण त्यांच्या गटातील एका आमदाराची आमदारकी रद्द होण्याची शक्यता आहे.

चोपडा मतदार संघाच्या आमदार लताबाई चंद्रकांत सोनवणे (mla latabai sonawane) यांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता आहे. सोनवणे यांच्या जातप्रमाणपत्राची राष्ट्रीय न्यायाधिकरण समितीकडून चौकशी सुरू आहे. त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. सोनवणेंची आमदारकी रद्द करण्यासाठी बिरसा फायटर्स (द ट्रायबल ऑर्गनायझेशन) मैदानात उतरले आहे.

या संघटनेने थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यामुळे राज्यपाल सोनवणेंबाबत काय निर्णय घेतात, याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. बिरसा फायटर्स या संघटनेच्या राज्यभरातील एकूण 522 पदाधिकाऱ्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सोनवणे यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी केली आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी दिली आहे.

 lata sonawane, eknath shinde
Rahul Shewale : आदित्य ठाकरेंनीच 'त्या' महिलेला माझ्याविरोधात फूस लावली ; शेवाळेंचा आरोप

लताबाई चंद्रकांत सोनवणे या शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर आता नवीन सरकारच्या शिंदे गटाच्या आमदार आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत लता सोनावणे या चोपडा मतदारसंघातून शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडून आल्या आहेत. या निवडणुकीत त्यांना ७८ हजार १३७ मतं मिळाली. त्यांनी जगदीशचंद्र वळवी व चंद्रकांत बरेला यांना पराभूत केलं. शिवसेनेत बंड झाल्यानंतर लता सोनावणे शिंदे गटात गेल्या आहेत.

सोनवणे यांनी निवडणकू लढवताना खोटे जात वैधता प्रमाणपत्र दाखल केले असल्याची तक्रार करण्यात आली आहे. हे प्रकरण सध्या जातप्रमाणपत्राची राष्ट्रीय न्यायाधिकरण समितीकडे आहे.

 lata sonawane, eknath shinde
Anand Mahindra : आनंद महिंद्रा यांनी यासाठी मानले नितीन गडकरींचे आभार

आमदार सोनवणे यांचे "टोकरे कोळी" अनुसूचित जमातीचे जात वधता प्रमाणपत्र, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, नंदुरबार जिल्हा यांनी 9 फेब्रुवारी, 2022 रोजी अवैध ठरवले होते. त्यानंतर सोनवणे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर रीट याचिकेतनू कमिटीच्या निर्णयाला आव्हान दिले होते. यावेळी मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद येथील खंडपीठाने 10 जून 2022 रोजी ही याचिका फेटाळून लावत प्रमाणपत्र पडताळणी समितीचा निर्णय योग्य असल्याचा निर्णय दिला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com