Nawab Malik -Amruta Fadanvis  
मुंबई

मलिकांच्या पत्रकार परिषदांना वैतागल्या अमृता फडणवीस म्हणाल्या, बिगड़े नवाब ने...

नवाब मलिक गेल्या काही दिवसांपासून दररोज पत्रकार परिषदाद्वारे मोठमोठे खुलासे करत आहेत. त्यावर अमृता फडणवीसांनी मलिकांवर टिका केली आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मंगळवारी (९ नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे आरोप केले. अंडरवर्ल्ड माफियांकडून त्यांनी २०-२५ वर्षांपुर्वी कवडीमोल भावात जमीन विकत घेतल्याचा आरोप फडणवीसांनी केला. त्यानंतर नवाब मलिकांनी पुन्हा पत्रकार परिषद घेत फडणवीसांनी केलेले सर्व आरोप फेटाळले आणि त्या जमीनीशी संबंधित सर्व व्यवहार कायदेशी रित्या झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यानंतर आज पुन्हा देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांनी नवाब मलिकांवर ट्विटरच्या माध्यमातून टिका केली आहे. बिगड़े नवाब ने- प्रेस कॉन्फ़्रेन्स पर प्रेस कॉन्फ़्रेन्स, प्रेस कॉन्फ़्रेन्स पर प्रेस कॉन्फ़्रेन्स, प्रेस कॉन्फ़्रेन्स पर प्रेस कॉन्फ़्रेन्स बुलाई, लेकिन हर बार झूठ और मक्कारी की ही बाते हमे सुनाई, लक्ष्य इनका एक ही है, मेरे भई बचाना है इन्हें अपना जमाई और काली कमाई! अशा शब्दात नवाब मलिकांवर टिका केली आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीनंतर आपण बॉंम्ब फोडणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर काल त्यांनी पत्रकार परिषदेत नबाव मलिकांनी फडणवीसांचे फटाके भिजले आणि फुसके निघाले, अशी खोचक टिकाही केली. तसेच फडणवीस यांनी जे आरोप केले होते, त्यावर स्पष्टीकरणही दिले.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे फटाके भिजले आणि फुसके निघाले. गोवावाला कंपाऊडची (Goawala Compound) जी जमीन खरेदी केली, ही जमीन खरेदी करतेवेळी सर्व व्यवहार हे कायदेशीर रित्या झाले आहेत. आजही त्या जागेत ज्यांच्याकडून ती जमीन घेतली त्या सरदार शाह अली खान यांच घर आहे. त्यावेळी आम्ही तिथे भाडेकरु म्हणून राहत होतो. त्यामुळे त्यावेळेच्या किमतीनुसार सरदार शाह अली खान यांच्याकडून कायदेशीररित्या ती जमीन खरेदी करण्यात आली.

मी अंडरवर्ल्ड माफियांकडून कवडीमोल दराने जमीन घेतल्याचा आरोप फडणवीसांनी केला. पण फडणवीसांना ज्यांनी ही माहिती दिली ती चुकीची माहिती दिली. ते कच्चे खेळाडू आहेत, तुम्ही सांगितलं असतं तर मीच तुम्हाला या व्यवहाराशी संबंधित सर्व कागदपत्र दिले असते. असेही मलिकांनी सांगितलं.

नवाब मलिकांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर आज ते पुन्हा पत्रकार परिषद घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात अंडरवर्ल्ड माफियांशी कसे संबंध होते, माफियांच्या माध्यमातून त्यांनी मुंबईला कसे ओलीस ठेवले होते, याचा खुलास ते करणार आहेत. त्यामुळे आज नवाब मलिक काय बोलतात, याकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT