फडणवीसांचा बार फुसका, उद्या हायड्रोजन बॉंम्ब फोडणार; नवाब मलिकांचा इशारा

फडणवीसांनी राईचा पर्वत केला, अंडरवर्ल्डशी माझा कोणताही संबंध नाही
फडणवीसांचा बार फुसका, उद्या हायड्रोजन बॉंम्ब फोडणार; नवाब मलिकांचा इशारा
Published on
Updated on

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे (Devendra Fadanvis) फटाके भिजले आणि फुसके निघाले. गोवावाला कंपाऊडची (Goawala Compound) जी जमीन खरेदी केली, ही जमीन खरेदी करतेवेळी सर्व व्यवहार हे कायदेशीर रित्या झाले आहेत. आजही त्या जागेत ज्यांच्याकडून ती जमीन घेतली त्या सरदार शाह अली खान यांच घर आहे. त्यावेळी आम्ही तिथे भाडेकरु म्हणून राहत होतो. त्यामुळे त्यावेळेच्या किमतीनुसार सरदार शाह अली खान यांच्याकडून कायदेशीररित्या ती जमीन खरेदी करण्यात आली. तसेच माझे कोणत्याही अंडरवर्ल्ड माफियांशी संबंध नाहीत, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नबाव मलिक (Nawab Malik) यांनी दिले आहे.

आज दुपारी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत, नवाब मलिकांनी १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपींकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप केला होता. त्यावर नवाब मलिकांनी फडणवीसांना उत्तर दिलं आहे. देवेंद्रजी १९९९ ला तुम्ही या शहरात पहिल्यांदा आमदार झालात आणि या शहरात आलात. पण त्यापुर्वीही माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे साहेबांनी अनेकांचे दाऊदशी संबंध जोडले होते. पण गेल्या २६ वर्षांत कोणालाही हे आरोप सिद्ध करता आले नाहीत. मी अंडरवर्ल्ड माफियांकडून कवडीमोल दराने जमीन घेतल्याचा आरोप फडणवीसांनी केला. पण फडणवीसांना ज्यांनी ही माहिती दिली ती चुकीची माहिती दिली. ते कच्चे खेळाडू आहेत, तुम्ही सांगितलं असतं तर मीच तुम्हाला या व्यवहाराशी संबंधित सर्व कागदपत्र दिले असते. असेही नवाब मलिकांनी म्हटंल आहे. याचवेळी बोलताना मलिकांनी फडणवीसांना थेट इशाराही दिला आहे.

फडणवीसांचा बार फुसका, उद्या हायड्रोजन बॉंम्ब फोडणार; नवाब मलिकांचा इशारा
भाजप नेता बरळला, 'एका खिशात ब्राह्मण तर दूसऱ्यात बनिया समाज'

माझे अंडरवर्ल्ड माफियांशी संबंध असल्याचा आरोप तुम्ही केला पण अंडरवर्ल्डचा जो खेळ तुम्ही सुरु केला आहे, त्यावर मी आता बोलणार नाही, मात्र उद्या सकाळी १० वाजता देवेंद्र फडणवीसांचा अंडरवर्ल्डशी काय संबंध आहे आणि आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी दबाव तंत्राचा वापर करुन सर्व शहराला कसं ओलीस ठेवलं होतं त्याचा पर्दाफाश करणार, असल्याचा इशाराही मलिक यांनी दिला आहे. देवेंद्र फडणवीसांनी चूकीची माहिती घेऊन बिनबुडाचे आरोप केले. असे म्हणत त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले.

तसेच, फडणवीसांनी कोणत्याही यंत्रणेकडे जावं, चौकशीसाठी तयार आहे. कोणत्याही अंडरवर्ल्डच्या कोणत्याही माणसांकडून जमीन विकत घेतली नाही. पण उद्या सकाळी अंडरवर्ल्डचा हायड्रोजनचा बॉम्ब फोडणार आहे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना कोणता अंडरवर्ल्ड मुंबईत आला होता, परदेशातून कसे व्यवहार होत होते. शहराला कसे ओलीस ठेवण्यात आले होते, या सर्वांचा मी उद्या सकाळी पर्दाफाश करणार असल्याचा इशारा मलिकांनी दिला आहे.

माझ्या मुलीच्या आणि जावयाच्या घरात गांजा सापडल्याचा आरोप फडणीवसांनी केला, हे तुम्ही सिद्ध करुन दाखवा, ते माफी मागत नाहीत. आशा आहे, ते माफी मागणार नाहीत. लढाई सुरुच राहिल. माझी मुलगी उद्या फडणवीस यांना कायदेशीर नोटीस पाठवेल, असे म्हणत त्यांनी सावध रहा, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com