Amruta - Devendra Fadanvis and Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Amruta Fadnavis: उद्धव ठाकरेंच्या 'कम ऑन किल मी...' या टीकेवर अमृता फडणवीस म्हणतात, आपला देश शांतताप्रिय...

Uddhav Thackeray Shivsena News: शिवसेनेच्या मेळाव्यात प्रहार सिनेमाचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेवर घणाघाती टीका केली होती. ‘मी या गद्दारांच्या समोर उभा आहे आणि सांगतो त्यांना मी कम ऑन किल मी असं त्यांनी खुल चॅलेंजच दिलं होतं.

Deepak Kulkarni

Mumbai News : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या 59 व्या वर्धापनदिनाच्या मेळाव्यात 'कम ऑन किल मी'असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीकेची तोफ डागली होती.यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही 'मरे हुए को क्या मारना?'असा तत्काळ पलटवार केला होता. पण आता उद्धव ठाकरे यांच्या त्याच विधानावर अमृता फडणवीसांनी (Amruta Fadnavis) आपली प्रतिक्रिया दिली आहे.

एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग दिनानिमित्त पुण्यात वारकरी,विद्यार्थी आणि पुणेकरांसह योगासनं केली. तर अमृता फडणवीस यांनी मुंबईत योग दिवस साजरा केला. या कार्यक्रमात त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

सीएम आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस म्हणाल्या,आपला शांतताप्रिय देश आहे. आणि शांतताप्रिय पक्ष सत्तेत आहे.तर आपल्याला कुणी मारेल असा विचार करण्याची गरज नाही, असं मत व्यक्त करतानाच उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) टीकेतली हवाच काढून टाकली आहे.

तसेच पुढे अमृता फडणवीसांनी देवेंद्रजी हे योगीच आहेत.ते कधीच कसरत करत नाही. पण ध्यानधारणा करत असतात’ फिटनेसवर भाष्य केलं. त्यांनी 11 व्या आंतरराष्ट्रीय दिनाच्या दिवशी मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसोबत 11वा आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा केला.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले..?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगासनानंतर मीडियाशी संवाद साधला. ते म्हणाले, आम्ही आज वारकऱ्यांसह योगासनं केली, पुण्यातली कॉलेजेसही यात सहभागी झाल्याने भव्य कार्यक्रम झाला. प्राचीन संस्कृती,जीवन पद्धती,चिकित्सा पद्धती,ज्यात फक्त शरीराचा विचार केलेला नाही, मनाचाही विचार केला आहे. ती क्षमता योगात आहे. आज मोदीजींमुळे योगासनांना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वीकारण्यात आलं आहे, असंही फडणवीसांनी सांगितलं.

'कम ऑन किल मी...'

शिवसेनेच्या मेळाव्यात प्रहार सिनेमाचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेवर घणाघाती टीका केली होती. ‘मी या गद्दारांच्या समोर उभा आहे आणि सांगतो त्यांना मी कम ऑन किल मी असं त्यांनी खुल चॅलेंजच दिलं होतं.

असेल हिंमत तर या अंगावर… फक्त अंगावर येणार असेल अॅब्युलन्स घेऊन या.कारण येताना सरळ याल जाताना आडवे होऊन जाल.’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या भाषणातून शिंदेंवर हल्लाबोल केला होता. त्यांच्या याच विधानावर आता अमृता फडणवीस मोजक्याच शब्दांत टिप्पणी केली आहे.

शिंदेंचा पलटवार...

एकनाथ शिंदे म्हणाले की, 'उद्धव ठाकरे हे सत्तेसाठी लाचार झाले. त्यांनी हिंदुत्त्व बाजूला सोडून दिलं. महाराष्ट्रातील जनतेशी प्रतारणा केली. मतदारांना धोका दिला. उद्धव ठाकरे हे सत्तेसाठी अगतिक, लाचार झाले', असे एकनाथ शिंदे म्हणाले. आता निवडणुकीचं वारं दिसत असताना त्यांना पुन्हा हिंदुत्त्व, मराठी माणूस आठवत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT