Shivsena Politics: महाडिक, मुश्रीफ अन् सतेज पाटलांच्या बालेकिल्ल्यात शिंदे मोठा धमाका करणार; एक दोन नव्हे,तर 30 मात्तबर नेते ...

Kolhapur News : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील माजी नगरसेवकांचा एक गट शिंदे शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहे याच्या चर्चा रंगल्या होत्या. गेल्या महिना दीड महिन्यापासून या चर्चा चांगल्याच रंगल्या असून पक्षप्रवेश कधी होणार याकडे कार्यकर्त्यांचे नजर लागून राहिली होती.
Eknath Shinde Dhananjay Mahadik satej patil hasan mushrif .png
Eknath Shinde Dhananjay Mahadik satej patil hasan mushrif .pngSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेत महायुतीकडून जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. महापालिकेत बेरजेचे राजकारण जुळवण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेकडून काँग्रेसचे पदाधिकारी गळाला लावण्यासाठी हालचाल सुरू आहे. काँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख यांच्यासह अनेक कोल्हापूर महानगरपालिकेतील मातब्बर चेहऱ्यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने गळाला लावले आहे.

गेल्या महिनाभरापासून रखडलेला पक्षप्रवेशाला आता मूर्त स्वरूप येणार आहे. येत्या मंगळवारी पहिल्या टप्प्यात 20 जणांचा शिंदे सेनेत पक्ष प्रवेश होणार असल्याचा अंदाज आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पुढील आठवड्यातील तारीख निश्चित केली जाणार आहे. त्यानंतरच हे पक्षप्रवेश मुंबईत होणार आहेत.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील माजी नगरसेवकांचा एक गट शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहे याच्या चर्चा रंगल्या होत्या. गेल्या महिना दीड महिन्यापासून या चर्चा चांगल्याच रंगल्या असून पक्षप्रवेश कधी होणार याकडे कार्यकर्त्यांचे नजर लागून राहिली होती.

राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी एकूण 35 जणांची यादी असल्याचा दावा केला होता. त्यापैकी पहिल्या 20 जणांचा पक्षप्रवेश येत्या मंगळवार पर्यंत होणार आहे. त्यानंतर टप्प्‍याटप्प्याने प्रवेश होणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेशाचा कार्यक्रम होणार असून शारंगधर देशमुख यांच्यासह जवळपास 12 माजी नगरसेवकांसह प्रमुख पदाधिकारी पक्षप्रवेश करणार असल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात येत आहे.

Eknath Shinde Dhananjay Mahadik satej patil hasan mushrif .png
MNS Ban News: निवडणूक आयोगानं राज ठाकरे यांच्या मनसे पक्षावर बंदी घालावी; फडणवीसांच्या 'या' निकटवर्तीयानं केली मोठी मागणी

कोल्हापूर (Kolhapur) शहर हे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कोल्हापूर महानगरपालिकेवर भगवा फडकवण्यासाठी शिंदे यांची शिवसेना कामाला लागली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीची जबाबदारी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यावर सोपवली आहे. तर माजी खासदार संजय मंडलिक आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना एक एक करत गळाला लावण्याचे काम सुरू आहे.

शिंदेसेनेच्या घडामोडीवर सतेज पाटलांचे बारीक लक्ष

काँग्रेस मधील काही नाराज नगरसेवक हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत. याची कुणकुण लागतात काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी तातडीने महापालिकेतील काँग्रेसच्या नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीत अनेकजण आपण सतेज पाटील यांच्यासोबतच असल्याची घोषणा केली. मात्र, तरीदेखील आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून फुटीर वाटणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर विशेष बारीक लक्ष आहे. त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com