Amruta Fadnavis Sarkarnama
मुंबई

Amruta Fadnavis : "आजपासून अमृता फडणवीसांना मॅडम नाही, 'माँ अमृता' म्हणणार…"; भाजप आमदाराकडून कौतुकाचा वर्षाव

BJP MLA Mangal Prabhat Lodha On Amruta Fadnavis : " "दिव्याज फाऊंडेशनच्या सर्वेसर्वा अमृता फडणवीस यांना मी विनंती करतो की, समुद्रावरील कचरा साफ करता हे अत्यंत चांगलं काम करत आहात. मात्र, आता तुम्ही राजकारणातील कचरा स्वच्छ करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा."

Jagdish Patil

Mumbai News, 18 Sep : मुंबईतील गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनारा साफ करण्याची मोहिम राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी राबवली आहे.

दरवर्षी गणेश विसर्जनानंतर अमृता फडणवीस यांच्या दिव्याज फाउंडेशनच्यावतीने (Divyaj Foundation) समुद्र किनारा स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली जाते. याच मोहिमे अंतर्गत वर्सोवा किनारपट्टीवर स्वच्छता मोहिम सुरु झाली आहे.

या कार्यक्रमाला अमृता फडणवीस यांच्यासह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) आणि मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर उपस्थित होते. यावेळी अमृता फडणवीस यांनी राबवलेल्या मोहिमेचं मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी तोंडभरून कौतुक केलं आहे. शिवाय इथून पुढे आपण त्यांना 'अमृता मॅडम नाही, तर माँ अमृता' असं म्हणणार असल्यांही म्हटलं आहे.

मंगल प्रभात लोढा नेमकं काय म्हणाले?

स्वच्छता मोहिमेच्या कार्यक्रमा दरम्यान बोलताना मंगल प्रभात लोढा म्हणाले, "दिव्याज फाऊंडेशनच्या सर्वेसर्वा अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना मी विनंती करतो की, समुद्रावरील कचरा साफ करता हे अत्यंत चांगलं काम करत आहात. मात्र, आता तुम्ही राजकारणातील कचरा स्वच्छ करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा. अमृता फडणवीसांनी आता आईचं रुप घेतलं आहे. मुलां-मुलींसाठी त्या जे काम करत आहेत, त्यासाठी मी आजपासून त्यांना अमृता मॅडम नाही, तर माँ अमृता असं म्हणणार."

राजकारण असो वा आपलं मनं स्वच्छता पाहिजे

दरम्यान, यावेळी अमृता फडणवीस यांनी देखील सर्वत्र स्वच्छता ठेवायला पाहिजे असं आवाहन केलं. त्या म्हणाल्या, "आपल्याकडे नद्या, तलाव, समुद्र असे पाण्याचे स्रोत स्वच्छ ठेवले पाहिजेत. आपण काळजी घेतली तर ते स्वच्छ राहतील. समुद्र आणि तलावात प्लास्टिक टाकल्यामुळे मोठ्या समस्या निर्माण होतात.

शहराचा आर्थिक विकास करायचा असेल तर स्वच्छता राखली पाहिजे. आपल्या घराप्रमाणे आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. आपण देवभक्त आहोत, देवाला स्वच्छता आवडते. त्यामुळे राजकारण असो किंवा आपली मनं असो सर्वत्र स्वच्छता असली पाहिजे."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT