Nawab Malik : ड्रायव्हरची चूक, नवाब मलिकांच्या जावयाचा भीषण अपघात; 'आयसीयू'त दाखल

Nawab Malik Son-in-law Car Accident : नवाब मलिक यांचे जावई पत्नीसोबत रूग्णालयात नियमित तपासणीसाठी गेले होते. तेव्हा, हा अपघात झाला आहे. त्यांच्यावर 'आयसीयू'त उपचार सुरू आहेत.
Nawab Malik son in law Sameer Khan was seriously injured in a car accident
Nawab Malik son in law Sameer Khan was seriously injured in a car accidentsarkarnama
Published on
Updated on

Nawab Malik son-in-law critical after accident: राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजितदादा पवार ) आमदार नवाब मलिक यांच्या जावयाचा भीषण अपघात झाला आहे. कार चालकाचा पाय चुकून अ‍ॅक्सलरेटवर पडल्यामुळे मलिक यांचे जावई समीर खान गाडीसोबत फरफटत गेले. या अपघातात समीर खान यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर 'आयसीयू'मध्ये उपचार सुरू आहेत.

ही घटना मंगळवारी 17 सप्टेंबरला घडली आहे. समीर खान हे रूग्णालयात गेले होते. तिथून घरी परत येताना त्यांच्या कार चालकाचा पाय अचानक अ‍ॅक्सलरेटवर पडला. त्यामुळे गाडीत बसत असलेले समीर खान हे कारसोबत काही अंतरापर्यंत फरफटत गेले. यात ते गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी नवाब मलिक ( nawab Malik ) यांच्या कन्या निलोफर खान आणि त्यांचे जावई समीर खान हे कुर्ला येथील क्रिटी केअर रूग्णालयात नियमित तपासणी करण्यासाठी गेले होते. तपासणी करून बाहेर आल्यानंतर त्यांनी कारचालकाला गाडी काढण्यास सांगितली.

तेव्हा, समीन खान हे गाडीत बसत होते. मात्र, कार चालकाचा पाय अचानक अ‍ॅक्सलरेटवर पडला. त्यामुळे गाडीत बसत असलेले समीर खान हे कारसोबत काही अंतरापर्यंत फरफटत गेले.

कार 'एचडीआयएल' वसाहतीच्या संरक्षण भिंतीवर आदळली. अपघातात समीर खान यांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर 'आयसीयू'त उपचार सुरू आहेत. तर, निलोफर यांच्या हाताला दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे.

Nawab Malik son in law Sameer Khan was seriously injured in a car accident
Politics on Nawab Malik : नवाब मलिक प्रकरण : खरे, खोटे हा वेगळा विषय; राजकीय नेते पाहताहेत स्वतःची सोय

या अपघात प्रकरणी कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अबुल मोहम्मद सोफ अन्सारी, असं त्याचं नाव आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com