Sadanad Tharwal & Uddhav Thackeray Latest News
Sadanad Tharwal & Uddhav Thackeray Latest News Sarkarnama
मुंबई

सेनेकडून कल्याण जिल्हाप्रमुखपदी आनंद दिघे यांचे विश्वासू थरवळ यांची नियुक्ती

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : शिवसेनेतील (Shivsena) कल्याण जिल्हाप्रमुखपदी डोंबिवलीतील ज्येष्ठ शिवसैनिक व 'मातोश्री'च्या (Matoshri) खास विश्वासातील सदानंद थरवळ (Sadanad Tharwal) यांची निवड झाली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध झालेल्या पत्रकाद्वारे ही नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

गोपाळ लांडगे यांनी पदाचा राजीनामा देत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना समर्थन दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर निष्ठावान गटातील थरवळ यांचे नाव आघाडीवर होते. अखेर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. डोंबिवली, कल्याण ग्रामीण व मुंब्रा कळवा हा विधानसभा क्षेत्रासाठी थरवळ काम पाहतील, यासोबतच अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व विधानसभेसाठी चंद्रकांत बोडारे, सह संपर्कप्रमुख म्हणून कल्याण पूर्वचे रमेश जाधव व डोंबिवली शहरप्रमुख पदी विवेक खामकर व कल्याण पूर्व शहर प्रमुख पदी शरद पाटील यांची निवड करण्यात आली आहे. (Sadanad Tharwal & Uddhav Thackeray Latest News)

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर कल्याण, डोंबिवलीसह अंबरनाथ, उल्हासनगर येथील शिंदे समर्थक गटातील नगरसेवकांनी शिंदे यांना आपला पाठींबा जाहीर केला होता. ठाकरे यांच्या निष्ठावान गटातील सुभाष भोईर, सदानंद थरवळ, प्रभाकर चौधरी, तात्या माने, भय्या पाटील, रमेश जाधव यांसारख्या शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत त्यांच्या सोबत कायम असल्याचे सांगितले होते.

कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी देखील प्रथम ठाकरे यांना पाठींबा जाहीर केला होता. मात्र नंतर त्यांनी पलटी मारत शिंदे यांना पाठींबा जाहीर करत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. तसेच डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे हे देखील शिंदे गटात सामील झाले होते. यामुळे या रिक्त पदांवर कोणत्या निष्ठावान शिवसैनिकांची वर्णी लागते याविषयी गेले काही दिवस चर्चा सुरु होती. अखेर जिल्हाप्रमुख म्हणून थरवळ व डोंबिवली शहर प्रमुख पदी पाटील यांची निवड करण्यात आली आहे. कल्याणचे सुत्र हे आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडे होती. मात्र त्यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांची पदावरुन हकालपट्टी करण्यात आली होती.

शिवसेना प्रमुखांचा कडवट शिवसैनिक आणि आनंद दिघे यांच्या तालमीतील निष्कलंक, निष्ठावान अशी थरवळ यांची ओळख आहे. ते 42 वर्ष शिवसेनेत आहेत. ठाणे जिल्ह्यामध्ये आनंद दिघे यांचे खास विश्वासू दूत होते. अशाच दूतांमधील दिघे यांची डोंबिवलीतील जोडगोळी म्हणजे सदानंद थरवळ, दिवंगत नितीन मटंगे होते. महत्वाची बैठक, पालिका निवडणुका, पालिका पदाधिकारी निवडणुकांमध्ये दिघे या दोघांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेत होते. थरवळ हे पालिकेत नगरसेवक होते. स्थायी समिती सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले. डोंबिवली उपजिल्हाप्रमुख म्हणून ते काम पाहत आहेत. डोंबिवलीत शिवसेनाप्रमुखांच्या स्वप्नातील रामनगर मधील बालभवन प्रकल्प मार्गी लावण्यात थरवळ यांचा सिंहाचा वाटा आहे. दोन वेळा ते डोंबिवली शहराचे शहरप्रमुख होते. या कालावधीत थरवळ यांनी शिवसेनेतर्फे लोकहिताचे अनेक उपक्रम राबविले. थरवळ यांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि डोंबिवलीकर असलेल्या रश्मी ठाकरे यांच्या बरोबर घरोब्याचे संबंध आहेत. येत्या काळात शिवसेनेला या भागात मजबूत करण्यासाठी निष्ठावान शिवसैनिकांची फळी उपयोगी येणार असल्याने या फळीतील एक हरहुन्नरी शिवसैनिक म्हणून थरवळ यांची निवड झाल्याचे समजते.

दरम्यान, मी एक निष्ठावान शिवसैनिक आहे. आत्तापर्यंत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. आत्ताही या क्षेत्रातील नागरि समस्या सोडविण्यासाठी तसेच येथील नागरिकांना मुलभूत सोयी सुविधा देण्यासाठी प्रयत्न करु, अशी प्रतिक्रिया कल्याण जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT