मुंबई : राजधानी मुंबईमध्ये वाहतुक कोंडीची समस्या सर्वांनाच माहिती आहे. मुंबईतील (Mumbai) याच वाहतुक कोंडींचे एक कारण म्हणजे येथे रस्त्यांवर आढळणारी बेवारस वाहने. यावर उपाय म्हणून पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी मुंबईच्या रस्त्यांवरील खटारा, बेवारस वाहनांवर कारवाई सुरू केली आहे. यासंदर्भात ट्वीट करत त्यांनी माहिती दिली आहे. (sanjay Pandey latest news)
पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, मुंबई महापालिकेच्या मदतीने शहरातून आतापर्यंत ३५८ खटारा गाड्या हटवण्यात आहेत. हे काम अद्यापही सुरू आहे. मुंबईच्या रस्त्यांवरील या खटारा गाड्या देवनारपर्यंत वेगाने नेण्यासाठी मोठ्या लॉरीची गरज आहे.'' असं ट्विट करत त्यांनी महिंद्रा आणि टाटा कंपन्यांना टॅग करत मदतीचं आवाहन केलं. त्यांच्या या आवाहनाला आनंद महिंद्रा यांनी प्रतिसाद दिला आहे.
विशेष म्हणजे महिंद्रा कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी त्यांच्या ट्विटला प्रतिसाद देत आपण त्यांच्या मदतीसाठी आपण ट्रक पाठवत असून आमची ट्रक टीम तुमच्याशी संपर्क करेल, असे सांगितले आहे. पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या ट्विटला प्रतिसाद देत आनंद महिंद्रा यांनी ट्वीट करत लिहिलं आहे की, ''मुंबईच्या आयुक्तपदी तुमची निवड झाल्यापासून तुम्ही जराही वेळ वाया घालवला नाही. तुमच्या विनंतीला प्रतिसाद देण्यास आम्हीही वेळ वाया घालवणार नाही. आमची महिंद्रा ट्रक टीम तुमच्याशी संपर्क करेल.”
त्याचबरोबर, आनंद मंहिंद्रा यांच्या ट्विटनंतर महिंद्रा कंपनीचे विक्री प्रमुख राजीव मलिक यांनीही त्यांच्या ट्विटला उत्तर दिले आहे. रस्त्यावरील खटारा वाहने काढून टाकण्यासाठी आणि रस्ते स्वच्छ करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. तसेच, CERO हा आमच्या समूहाचा एक भाग आहे आणि शाश्वत पुनर्वापराच्या पर्यायासाठी देखील मदत करू शकतो. त्यासाठी आम्ही कोणाशी संपर्क करायचा असे त्यांनी विचारले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.