'तू आघाडीचा प्रस्ताव दे, मी ठाकरेंच्या नावाने बोंब मारत हिंदूत्त्वाच्या गप्पा मारतो'

AIMIM| Imtiyaj Jaleel| Mahavikas Aghadi| इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला दिलेल्या ऑफरमुळए राज्यातील राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
इम्तियाज जलील (imtiaz jaleel)
इम्तियाज जलील (imtiaz jaleel) Facebook/@Ambadas Danve

मुंबई : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी राज्यातील महाविकास आघाडीला (MVA) दिलेल्या युतीच्या प्रस्तावामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधान आले आहे. खासदार जलील यांच्या आईचे निधन झाल्यामुळे त्यांनी श्रद्धांजली वाहण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh tope) यांच्याकडे जलील यांनी हा निरोप पाठवला आहे. (Latest political news in marathi)

एमआयएमचा एक खासदार, २९ नगरसेवक आणि दोन आमदार असलेल्या एमआयएमने भाजपला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी ही ऑफर दिली. भाजपा आमच्यामुळे जिंकते असे आरोप आमच्यावर करण्यात येतात. त्यामुळे जर हे संपवायचं असेल तर तुम्ही आमच्यासोबत युती करणार का, त्यांना फक्त मुस्लिमांची मतं हवी आहेत. आम्ही कुणालाही नको आहोत. मग कशाला राष्ट्रवादी? काँग्रेस स्वत:ला धर्मनिरपेक्ष मानतात त्यांनाही मुस्लीम मतं हवी आहेत. तर मग यावं काँग्रेसनं, आपण युती करु”,अशी ऑफर जलील यांनी दिली.

इम्तियाज जलील (imtiaz jaleel)
नाना म्हणाले; कराड काय सांगतात, त्यांची तर फाईल पण जात नाही...

एमआयएमच्या या ऑफरमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ही ऑफर नाकारली नसली तरी शिवसेनेने मात्र हा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. शिवसेनेचे उपनेते चंद्रकांत खैरे, विधानपरिषदेचे आमदार आंबादास दानवेंनी हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा प्लॅन असल्याचा आरोप केला आहे.

याचदरम्यान,आंबादास दानवे यांनी एक खास फेसबूक पोस्ट टाकून फडणवीस आणि जलील यांच्यावर निशाणा साधला आहे. दानवेंनी टाकलेल्या या फेसबूक पोस्टमध्ये फडणवीस आणि जलील यांचा एक फोटो असून यात ते एकमेकांशी बोलत आहेतया पोस्टमध्ये जलील फडणवीसांना म्हणत आहे की, "मी महाविकास आघाडीत सामील होण्याचा प्रस्ताव देतो." त्यावर फडणवीस म्हणत आहेत की, "मग मी लगेच ठाकरेंच्या नावाने बोंब मारत हिंदुत्वाच्या गप्पा मारतो." त्यामुळे या प्रकरणाला आता एक वेगळेच वळण लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com