Anandrao Adasul-Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Anandrao Adsul News: उद्धव ठाकरेंची साथ का सोडली? : आनंदराव आडसूळ करणार गौप्यस्फोट

माजी खासदार आनंदराव आडसूळ आज ठाकरे यांची साथ सोडण्याचे कारण सांगणार आहेत.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : शिवसेनेतील (Shivsena) बंडानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात प्रवेश केलेले माजी खासदार आनंदराव आडसूळ (Anandrao Adsul) आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडण्याचे कारण सांगणार आहेत. त्यामुळे आडसूळ यांच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागल आहे. (Anandrao Adsul will make a secret explosion)

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवतीर्थवर दर्शनासाठी आलेले माजी खासदार आडसूळ हे माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी आपण शिवसेना सोडण्याचे कारण सांगणार असल्याचे स्पष्ट केले.

आडळसूळ म्हणाले, गट-तटाचा प्रश्न नाही. बाळासाहेब ठाकरे हे आमचे श्रद्धास्थान आहे. आम्ही आज जे काय आहोत, ते बाळासाहेबांमुळेच आहेत. आम्ही आज त्यांचा जन्मदिवस साजरा करत आहोत, त्यामुळे येथे गट-तट येतो कुठे. आमची बाळासाहेबांवर श्रद्धा आहे. त्यामुळे मी आज त्यांच्या दर्शनासाठी आलो आहे.

मी शिसैनिक आहे, शिवसेनेचा नेता आहे. या अगोदरही हेातो आणि आताही आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील श्रद्धेपोटी मी बाळासाहेबांच्या दर्शनासाठी आलो आहे. मारणाऱ्यांचे हात धरता येतो; पण बोलणाऱ्याचं तोंडं धरता येत नाही, असेही त्यांनी गद्दार म्हणून हिणवणाऱ्या नेत्यांना सुनावले. गद्दार कोण आहे, याबाबत मी आज स्पष्टपणे बोलणार आहे. मी माझी भूमिका त्या पत्रकार परिषदेत मांडणार आहे, असेही आनंदराव आडसूळ यांनी स्पष्ट केले.

बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचे अविस्मरणीय असे अनेक किस्से आहेत. कारण, मी त्यांच्यासोबत अनेक दौरे केले आहेत. तसेच, सांगलीचे संपर्कप्रमुख, तर अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम, वर्धा या विभागाचे नेतृत्व केले आहे. अमरावतीमध्ये खासदार म्हणून मी पाच वेळा निवडून आलो आहे. आज मी ठाकरे यांची साथ का सोडली, यावरच बोणार असल्याचे स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT