Anandrao Adsul, Eknath Shinde, Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Anandrao Adsul Meet Ajit Pawar : एकनाथ शिंदेंचा विश्वासू नेता पलटी मारणार? अडसूळ-अजितदादांच्या भेटीने चर्चांना उधाण

Anandrao Adsul Meet Ajit Pawar : माजी खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू नेते म्हणून ओळख असणारे आनंदराव अडसूळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

Jagdish Patil

Anandrao Adsul Meet Ajit Pawar : माजी खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू नेते म्हणून ओळख असणारे आनंदराव अडसूळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांची राष्ट्रवादी कार्यालयात भेट झाली. अजित पवार राष्ट्रवादीच्या कार्यालयात पक्षाच्या बैठकीसाठी आले होते. तेव्हा त्यांची भेट घेण्यासाठी अडसूळ आले होते.

या दोघांमध्ये झालेली ही भेट सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जात असलं तरी शिंदेंचे (Eknath Shinde) नेते दादांच्या राष्ट्रवादीत जाणार का? या चर्चांना उधाण आलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. पक्षांप्रमाणे अनेक इच्छुकांनी देखील निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती (Mahayuti) अशी दुहेरी लढत होणार असल्याचं निश्चित झालं आहे.

मात्र, युती आणि आघाडी धर्मामुळे अनेक मतदारसंघात मित्र पक्षातील इच्छुकांना तिकीट नाकारलं जाण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर आता इच्छुक उमेदवार वेगळ्या पर्यायाची चाचपणी करत आहेत. अशातच आता लोकसभेला अमरावती मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी प्रचंड प्रयत्न करुनही पदरी निराशा आलेले अडसूळ आता विधानसभेसाठी वेगळी वाट निवडणार का? आणि यासाठीच त्यांनी भेटीगाठी सुरु केल्या आहेत का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाबद्दल एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील काही नेत्यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. शिवाय लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादावरूनही शिंदे आणि अजितदादा गटात वाद झाला होता. तर भाजपच्याही काही पदाधिकाऱ्यांनी देखील अजित पवार यांच्यासोबत युती नको, अशी उघड उघड भूमिका घेतली आहे.

याच सर्व पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदेंचे नेते अजित पवार यांची भेट घ्यायला गेल्यामुळे ही भेट महत्वाची मानली जात आहे. दरम्यान, या भेटीत या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबाबतची माहिती मिळाली नसली तरी, या भेटीमुळे विविध राजकीय चर्चांना मात्र उधाण आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT