Congress Vs Shiv Sena : ठाकरेंच्या सेनेने उमेदवार लादल्यास नागपुरात ‘सांगली पॅटर्न'चा धोका

Maharashtra Assembly Election Congress Shiv Sena : काँग्रेसचे मीडिया सेलचे प्रदेश प्रमुख विशाल मुत्तेमवार, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे हे नागपूर दक्षिणमधून इच्छुक आहेत.
Uddahv Thackeray, Nana Patole
Uddahv Thackeray, Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

Nagpur : महाविकास आघाडीत विधानसभा मतदारसंघासाठी नागपूर शहरात मोठी रस्सीखेच सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने दोन आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने एका जागेची मागणी केली आहे. त्यावरून काँग्रेसमध्ये मोठी नाराजी आहे.

काँग्रेस नागपूरमधील सहापैकी एकही जागा सोडायला तयार नाही. विशेषतः दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघावरचा आग्रह उद्धव सेनेने सोडला नाही तर ‘सांगली' पॅटर्न येथे होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दक्षिण नागपूरमध्ये सध्या भाजपचे मोहन मते आमदार आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे गिरीश पांडव यांनी निवडणूक लढवली होती. अवघ्या चार हजाराच्या फरकाने त्यांचा पराभव झाला. लोकसभेनंतर बरेच राजकीय समीकरण बदलले आहे. महायुतीच्या विरोधात असलेले वातावरण बघून काँग्रेसच्या अनेक इच्छुकांची येथून लढायची तयारी आहे.

Uddahv Thackeray, Nana Patole
Assembly Election 2024 : अपक्ष आमदारानं दिला भाजप अन् शिंदे गटाला '440 व्होल्ट'चा झटका

काँग्रेसचे मीडिया सेलचे प्रदेश प्रमुख विशाल मुत्तेमवार, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे इच्छुक आहेत. गिरीश पांडव पराभूत झाल्यानंतरही सातत्याने मतदारसंघाच्या संपर्कात आहेत. त्यांना पुन्हा एकदा येथून संधी हवी आहे. काँग्रेसचे दीनानाथ पडोळे येथून सलग तीन वेळा निवडूण आले होते. त्यापूर्वी काँग्रेसचे स्व. गोविंदराव वंजारी यांनीसुद्धा विजय मिळवला होता. त्यामुळे दक्षिणवरचा आपला हक्क सोडण्यास काँग्रेसचा विरोध आहे.

दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेला दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघच हवा आहे. शिंदे सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दक्षिण आणि पूर्व हे दोन मतदारसंघ पक्षाकडे मागितले आहेत. यातही दक्षिणवर सर्वांचा सर्वाधिक भर आहे. उद्धव सेनेचे जिल्हा प्रमुख प्रमोद मानमोडे आणि किशोर कुमेरिया येथून लढण्यास उत्सुक आहेत.

Uddahv Thackeray, Nana Patole
Nagpur Hit and Run Case : नागपूर 'ऑडी'कार प्रकरणावरून सुषमा अंधारेंचा काँग्रेसवरही हल्लाबोल

भाजपसोबत युती असताना दक्षिण नागपूर शिवसेनेकडे होते. तीन निवडणुका येथून युतीने एकत्रित लढल्या. मात्र शिवसेनेला एकदाही यश आले नाही. युती आणि आघाडी तुटल्यानंतर भाजपचे सुधाकर कोहळे येथून निवडूण आले. त्यांनी शिवसेनेचे कुमेरिया आणि काँग्रेसचे दिग्गज नेते सतीश चतुर्वेदी यांचा पराभव केला होता. याशिवाय दीनानाथ पडोळे हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढले होते. तेसुद्धा पराभूत झाले. असा सर्व इतिहास दक्षिणचा आहे.

आजवर झालेल्या निवडणुकांचे निकाल आणि मतदानाची टक्केवारी बघता आमचाच या मतदारसंघावर पहिला हक्क असल्याचा दावा काँग्रेसचा आहे. महाविकास आघाडीने शिवसेनेचा उमेदवार लादल्यास काँग्रेसमध्ये बंडखोरी अटळ मानली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com