MLA Praniti Shinde Sarkarnama
मुंबई

Maharashtra Budget 2024 : ...अन् सरकार त्याठिकाणी बुलडोझर फिरवतेय; विधानसभेत प्रणिती शिंदे कडाडल्या

Maharashtra Assembly budget session : रेल्वे हद्दीतील झोपडपट्टया नियमित न करता सरकारकडून झोपडपट्ट्यावर बुलडोझर फिरवला जात असल्याचा घणाघात आमदार प्रणिती शिंदे यांनी केला.

Sachin Waghmare

Mumbai News : रेल्वे हद्दीतील झोपडपट्टया नियमित करण्यात याव्यात, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे. त्याशिवाय मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन याचे सविस्तर पत्रही दिले आहे. मात्र, याकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष होत आहे. रेल्वेच्या हद्दीतील झोपडपट्टया नियमित न करता सरकारकडून त्या झोपडपट्ट्यावर बुलडोझर फिरवला जात असल्याचा घणाघात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी विधानसभेत बोलताना केला.

हिवाळी आधिवेशनादरम्यान मागणी केलेले सोलापुरातील प्रश्न 'जैसे थे' च आहेत. सोलापूर येथील सिव्हिल रुग्णालयातील रिक्त पदे भरण्याची मागणी केली होती. ही प्रक्रिया सुरु केली असून यावर कोणाचाच अंकुश नाही. ही भरती प्रक्रिया पारदर्शक व्हावी, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

मोहोळ तालुक्यातील बेगमपूर भागात हायवेचे काम सुरु आहे. या ठिकाणी रस्त्याचा काढण्यात येणारा मलबा भीमा नदी, सीना नदी पात्रात टाकण्यात येत आहे. भीमा नदीत पात्रात हा मलबा टाकण्यात येत असल्याने नदीचा प्रवाह थांबण्याची शक्यता आहे. या हायवेचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पंतप्रधान योजनेतून कर्ज देण्याचे आमिष दाखवून सरकारकडून फसवणूक केली जात आहे. त्यासाठी दहा लाख रुपयांचे व्यवहार दाखवावे लागत आहेत. सोलापुरातील साखर कारखान्याची (Sugar Factory) चिमणी काढायला लावली. मात्र, राज्य सरकारने एअरपोर्ट सुरू केलेले नाही.

दिल्ली ते नांदेड एअर लाइन्स सुरु झाली आहे. मात्र, सोलापूरची एअर लाइन्स सेवा सुरु केली जात नाही. या मधील सोलापूरकरांचे किमान चार-पाच प्रश्न मार्गी लागले तर समाधान वाटेल, असेही यावेळी बोलताना प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी स्पष्ट केले.

SCROLL FOR NEXT