Rohit Pawar : रोहित पवारांचा अजित पवारांवर गंभीर आरोप; म्हणाले, 'मला अडचणीत आणण्यासाठी गुंडांना...'

Rohit Pawar On DCM Ajit Pawar : आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Rohit Pawar and Ajit Pawar
Rohit Pawar and Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार भाजपबरोबर सरकारमध्ये सहभागी झाले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात राजकीय संघर्ष सुरु झाला. आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सध्या पाहायला मिळत आहे. यातच आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

"मला अडचणीत आणण्यासाठी आमच्या काकांनी (अजित पवार यांनी) माझ्या मतदारसंघातील एका गुंडांला जवळ केलं आहे", असा गंभीर आरोप रोहित पवारांनी केला. ते आज विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलत होते. रोहित पवारांच्या या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार काही बोलणार का ? हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Rohit Pawar and Ajit Pawar
Chief Ministers Secretariat : मोठी बातमी! मुख्यमंत्री सचिवालयाकडून तक्रार, जनतेच्या निवेदनांवर मुख्यमंत्री शिंदेंची बनावट सही

रोहित पवारांनी काय आरोप केला ?

"गेल्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना गुंड भेटत आहेत. मग लोकसभा निवडणुकीत तुम्ही गुंडांचा वापर करणार आहात का ? असा सवाल करत मला वाईट याचं वाटतं की, गुंड हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांना भेटतात. आमच्या काकांनी (अजित पवार यांनी) सुद्धा माझ्या मतदारसंघातील एका गुंडाला जवळ केलं. फक्त मला अडचणीत आणण्यासाठी. ही तुमची प्रवृत्ती, ही तुमची वृत्ती आहे का ? भाजपच्या जवळ गेल्यानंतर तुम्ही गुंडांचा वापर करणार का ?", असा सवाल करत रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

'पवार विरुद्ध पवार अशी लढाई...'

"शरद पवार साहेब हे कुठेही अडकून पडत नाहीत. प्रत्येक मतदारसंघात फिरत असतात. आता जे नेते त्यांना सोडून भाजपबरोबर गेले आहेत, ना त्यांना निवडून आणण्यासाठी देखील शरद पवार यांनी प्रचार केला आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांना मर्यादित ठेवायचं असं नाही, तर भाजपला पवार विरुद्ध पवार अशी लढाई करायची आहे", असं रोहित पवार म्हणाले. तसेच आगामी निवडणुकीत जनता सरकारचा करेक्ट कार्यक्रम करतील, असा विश्वास असल्याचंही ते म्हणाले.

(Edited By-Ganesh Thombare)

Rohit Pawar and Ajit Pawar
PM Narendra Modi : मोदींच्या सभेतील खुर्च्यांवर राहुल गांधींचे फोटो; नेमकी सभा कुणाची ? उपस्थितांना प्रश्न

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com