Rutuja Latke, eknath shinde sarkarnama
मुंबई

Andheri By Election : ठाकरेंच्या उमेदवार ऋतुजा लटके शिंदे गटाच्या गळाला ?

Andheri By Election : मुर्जी पटेल यांनी गेल्या ६ महिन्यात मोठी तयारी केली आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (andheri by election)महाविकासआघाडी कडून ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.पण त्यांच्या उमेदवारीवरुन ठाकरे-शिंदे गटात चढाओढ लागली आहे.

शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) संभाव्य उमेदवार ऋतुजा लटके यांना गळाला लावण्यासाठी शिंदे गटाकडून जोरदार प्रयत्न सुरु आहे. ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना ‘बाळासाहेबांची शिवसेना ’ पक्षात आणून आपला पक्ष व भाजप युतीची उमेदवारी द्यावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्नशील आहेत.

भाजपच्या मुर्जी पटेल (Murji Patel) यांनी मतदारसंघात आपला प्रचार सुरु केला असला तरी शेवटच्या क्षणी ऋतुजा लटके शिंदे गटात येण्याची शक्यता गृहीत धरून सर्व पर्याय खुले ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे भाजपकडून अद्याप मुर्जी पटेल यांनी उमेदवारी अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही.

दरम्यान ऋतुजा लटके या शिंदे गटात प्रवेश करणार होत्या, अशी माहिती साम टीव्हीला सुत्रांनी दिली असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मुर्जी पटेल यांनी गेल्या ६ महिन्यात मोठी तयारी केली आहे.

मुर्जी पटेल यांनी पाठिंबा द्यावा, अशी लटके यांची इच्छा आहे. मुर्जी पटेल यांनी पाठिंबा दिला तर लटके या शिंदे गटात जाणार का? असा प्रश्न सध्या राजकीय गोटात विचारला जात आहे.

"कोट्यावधींचा खर्च केल्यामुळे मी माघार घेणार नाही," असा संदेश भाजप पक्षश्रेष्ठींना पटेल यांनी दिल्याने लटके यांचा शिंदे गटात प्रवेश रोखला आहे. मुर्जी पटेल पुन्हा अपक्ष उभे राहिले तर भाजपला फटका बसेल म्हणून लटके यांचा प्रवेश थांबला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT