ठाकरे गटाच्या तीन बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल ; मोदींची नक्कल करणं पडलं महागात

sushma andhare :ठाकरे यांच्या पक्षातील 8 नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 sushma andhare, Vinayak Raut, Bhaskar Jadhav
sushma andhare, Vinayak Raut, Bhaskar Jadhav sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे झालेल्या कार्यक्रमाला शिवसेनेच्या नेत्यांनी भाजप नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील 8 नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवसेना नेते विनायक राऊत(Vinayak Raut), भास्कर जाधव(Bhaskar Jadhav) आणि सुषमा अंधारे(Sushma Andhare) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील नौपाडा पोलिस ठाण्यात या तिघांसह एकूण आठ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

ठाण्याच्या गडकरी रंगायतनात रविवारी पार पडलेल्या महाप्रबोधन यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात प्रक्षोभक आणि चिथावणीखोर वक्तव्य,भाषणे करत शिंदे यांची प्रतिमा मलीन केली, तसेच इतर राजकीय नेत्यांबद्दल अवमानजनक शब्द वापरल्याचा आरोप करत शिंदे गटाचे नेते बाळा गवस यांनी तक्रार दाखल केली होती. राऊत, अंधारे, जाधव यांच्यासह धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे, माजी नगरसेवक मधुकर देशमुख आणि समालोचक सचिन चव्हाण यांच्याविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 sushma andhare, Vinayak Raut, Bhaskar Jadhav
N V Ramana : ठाकरे-शिंदे संघर्षांची सुनावणी करणाऱ्या सरन्यायाधीशांचा असा ही एक विक्रम !

अंधारे यांनी आपल्या भाषणात मोदींची नक्कल केली आहे, तर राऊत यांनी भाजपचे नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव न घेता, त्यांचा उल्लेख 'कोंबडी चोर'असा केला आहे. तर भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे.

गुन्हा दाखल झाल्यावर माध्यमांशी बोलताना अंधारे म्हणाल्या, "माझ्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर मला अजिबात आश्चर्य वगैरे काहीच वाटलं नाही. मी या सगळ्या गोष्टींसाठी मेंटली प्रीपेड होतेच. हे सगळं अपेक्षित आहे. मला नोटीस आली तर नक्की जाईन. कायदा माझ्या बापाने लिहिला आहे. माझ्या बापाने लिहिलेल्या कायद्याचा आदर मी नाही करायचा तर कुणी करायचा,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com