IPS Saurabh Tripathi News, Mumbai Police News updates
IPS Saurabh Tripathi News, Mumbai Police News updates Sarkarnama
मुंबई

अंगडिया व्यावसायिक खंडणी प्रकरण : IPS सौरभ त्रिपाठींवर गुन्हा दाखल

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : प्राप्तीकर विभागाची भीती दाखवून अंगडिया व्यवसायिकांकडून खंडणी (Ransom) वसूल करण्याच्या प्रकरणात IPS अधिकारी सौरभ त्रिपाठी यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. (Angadiya Commercial Ransom Case: IPS Saurabh Tripathi police case Filed)

अंगडिया व्यावसायिकांकडून खंडणी घेतल्याप्रकरणी मुंबईतील लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाण्यातील फारारी पोलिस निरीक्षक ओम वंगाटे यांना काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली होती. या पूर्वी या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना गुन्हे शाखेने अटक केली होती. (IPS Saurabh Tripathi News)

प्राप्तीकर विभागाच्या कारवाईची भीती दाखवून अंगडिया व्यावसाय करणाऱ्यांकडून पोलिसांनी खंडणी वसुली केली हेाती. या प्रकरणी पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक यांच्यावर लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पैसे उकळल्याप्रकरणी तीन पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने मुंबई पोलिस दलात मोठी खळबळ उडाली होती.

या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक पोलिस उपायुक्त डॉ. सौरभ त्रिपाठी यांची बदली करण्यात आली होती. या बदलीनंतर सौरभ त्रिपाठी हे सुटीवर गेले होते. दरम्यान, अटक करण्यात आलेले आरोपी ओम वंगाटे यांची पोलिस कोठडी संपल्याने त्यांना आज न्यायालयात हजर केले गेले होते. त्या वेळी IPS अधिकारी सौरभ त्रिपाठी यांना या गुन्ह्यात आरोपी करण्यात यावे, असे तपास अधिकाऱ्यांनी मागणी करण्यात आली हेाती.

त्यानुसार अतिरिक्त पोलीस आयुक्त (दक्षिण प्रादेशिक परिमंडळ) दिलीप सावंत यांनी स्वतः या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानंतर आयपीएस अधिकारी त्रिपाठी यांच्यावर गुन्हा दाखल झाला. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या गुन्हे गुप्तावार्ता पथकाला (सीआययू) वर्ग करण्यात आला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT