एकनाथराव, त्या २५ आमदारांची यादी द्या; सरकार कसे बनवायचे, हे मी सांगतो : मुनगंटीवार

मुनगंटीवार यांनी विधानसभेत केलेल्या या मागणीने भाजपच्या सरकार स्थापनेबाबतच्या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.
Sudhir Mungantiwar-Eknath shinde
Sudhir Mungantiwar-Eknath shindeSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : महाविकास आघाडी सरकार पडण्याबाबत राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून वेगवेगळ्या तारखा देण्यात येतात. विधानसभेत आज (ता. १५ मार्च) अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान बोलताना माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी थेट शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनाच ‘तुम्ही ती २५ आमदारांची यादी मला द्या; सरकार कसे करायाचे, हे मी तुम्हाला सांगतो,’ असे म्हणत खळबळ उडवून दिली. मुनगंटीवार यांनी विधानसभेत केलेल्या या मागणीने भाजपच्या सरकार स्थापनेबाबतच्या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे. (Give a list of 25 MLA, I will tell you how to form a government : Sudhir Mungantiwar)

अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर चौफेर टीका केली. त्याचवेळी बोलताना मुनगंटीवार हे एकनाथ शिंदे यांना उद्देशून म्हणाले की, ‘एकनाथराव तुम्ही ती २५ आमदारांची यादी माझ्याकडे द्या. सरकार कसे बनवायचे, हे मी तुम्हाला सांगतो’ असे सांगत सरकार बनविण्याबाबत पुन्हा सूतोवाच केले.

Sudhir Mungantiwar-Eknath shinde
मुनगंटीवारांचा राऊतांना टोमणा; अजितदादांचा निर्णय फिरवल्याची करून दिली आठवण

हा अर्थसंकल्प ‘कट पेस्ट बजेट’ आहे. मागील अर्थसंकल्पातील योजना पुन्हा वाचून दाखवल्या आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावाने गाईगोठा योजना सुरू केली. त्याला निधी दिला. मात्र, सावित्रीबाई फुले आणि (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने फक्त योजनांची घोषणा केली. त्याची अंमलबजावणी मात्र अद्याप झालेली नाही, अशा शब्दांत मुनगंटीवार यांनी हल्लाबोल केला.

Sudhir Mungantiwar-Eknath shinde
दोन कोटींच्या जलयुक्त घोटाळा प्रकरणी दोन निवृत्त कृषी अधिकाऱ्यांसह चौघांना अटक

अर्थसंकल्पात गोरगरीब, विद्यार्थी, शेतकरी आत्महत्या, महिला अत्याचारासंबंधी, कृषी वीजबिल माफी, अंगणवाडी सेविका, शेतमजूर, बचत गट, बारा बलुतेदार यांना अर्थसंकल्पात कुठेही स्थान दिसत नाही. नुसतं घोषणा करून जनतेचे पोट भरणारे नाही. महाविकास आघाडी सरकारच्या घोषणा म्हणजे ‘दूधी हलवा’ सारखी गोष्ट आहे. राज्य सरकारच्या पंचसूत्रीचा अर्थसंकल्प म्हणजे नियमित खर्चात थोडी वाढ केली आहे, यापेक्षा वेगळे काही नाही. राज्य संकटात असताना नुसत्याच घोषणा केल्या आहेत. ‘गणपत वाणी बीडी पिताना चावायची नुसतीच काडी आणि मनाशीच म्हणायचा या जागेवर बांधीन माडी.’ या प्रमाणे सरकार वागत आहे, असे नगरविकास मंत्री एकनाथ खडसे यांना उद्देशून सुधीर मुनगंटीवार म्हणाले. त्याचवेळी त्यांनी एकनाथ शिंदेकडे २५ आमदारांची यादी मागितली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com