anil parab Vs Yogesh kadam Ramdas Kadam sarkarnama
मुंबई

Balasaheb Thackeray Death Case Controversy : बात निकली है तो दूर तक जायेगी! परबांनी विषय रामदास कदमांच्या पत्नीपर्यंत नेला; जाळलं की जाळून घेतलं?

Anil Parab Ramdas Kadam Wife Burn Case : अनिल परब यांनी रामदास कदम यांच्यावर गंभीर आरोप केले. बाळासाहेबांच्या मृत्यूवर संशय व्यक्त केल्याप्रकरणी अब्रुनुकसानीचा दावा देखील दाखल करणार असल्याचे सांगितले.

Roshan More

Anil Parab News : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या मेळाव्यात माजी मंत्री रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूनंतर दोन दिवस त्यांचा मृतदेह तसाच ठेवण्यात आला होता. मृत्यूनंतर बाळासाहेबांचे ठसे उद्धव ठाकरे यांनी घेतले, असे आरोप करत खळबळ उडवून दिली. त्यांच्या या आरोपाला उद्धव ठाकरेंचे विश्वासू नेते अनिल परब यांनी चोख उत्तर देत 1993 चे प्रकरण काढून रामदास कदमांची कोंडी केली आहे.

परब म्हणाले, रामदास कदमाच्या बायकोने स्वःला 1993 मध्ये जाळून घेतलं की तिला जाळण्यात आलं याची चौकशी व्हावी. कारण त्यांनी खेडमध्ये कोणाला बंगाल बांधून दिला याची देखील सगळ्यांना माहिती आहे.

'गृहराज्यमंत्री योगेश कदम यानी आपल्या बापाने काय उद्योग केले याची चौकशी करावी. गृहराज्यमंत्र्याने त्यांच्या आईने जाळून का घेतलं, कोणा कोणाच्या जमीनी ढापल्या, आपल्या घरातील लोक का आत्महत्या करतायेत याची देखील चौकशी करावी.', असे आव्हान परब यांनी योगेश कदम यांना दिले.

साक्षीदार पुढे आणू...

ज्योती रामदास कदम यांनी स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला की त्यांना जाळण्याचा प्रयत्न झाला याचे साक्षीदार आहेत. त्यांना देखील आम्ही समोर आणू. कोणाच्या घरात जाणं आम्हाला पटत नाही. पण बाळासाहेबांच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त करताय. मोठे डाॅक्टर तेथे असताना तुम्ही आरोप करताय.आम्ही रामदार कदमांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा कोर्टात दाखल करतोय, असे देखील अनिल परब यांनी सांगितले.

नार्को टेस्टसाठी आम्ही तयार...

बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करणाऱ्या रामदास कदमांनी आपण नार्को टेस्टसाठी तयार असल्याचे म्हटले होते. त्यावर अनिल परब यांनी हो नार्को टेस्ट झाली पाहिजे तसेच कुठल्या डाॅक्टरांनी त्यांना सांगितले तो डाॅक्टर देखील समोर आला पाहिजे. आम्ही देखील नार्को टेस्टसाठी तयार आहोत. आम्ही रामदास कदमला कोर्टात खेचतोय त्यांना 100 टक्के माफी मागावी लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT