Anil Parab
Anil Parab  sarkarnama
मुंबई

Anil Parab : अनिल परबांचा पाय आणखी खोलात ; सदानंद कदमांना ईडीचं समन्स

सरकारनामा ब्युरो

Anil Parab : ठाकरे गटाचे नेते, माजी परिवहन मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांनी ईडीनं समन्स पाठवले आहे. त्यामुळे अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Anil Parab latest news)

सदानंद कदम यांना पुढील आठवड्यात ईडीने त्यांच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. दापोली येथील परब यांच्या साई रिसॅार्ट प्रकरणात कदम यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे. दापोली रिसॉर्ट संदर्भातील कथित जमीन व्यवहार घोटाळ्याप्रकरणी कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दापोलीमध्ये जमीन खरेदी प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. २०२० मध्ये सदानंद कदम यांनी १ कोटी १० लाखाला जमीन खरेदी केली होती, त्या ठिकाणी रिसॅार्ट बांधण्यात आले, रिसॅार्ट बांधताना सीआरझेडच्या नियमाचं उल्लंघन झाले. त्यामुळे सरकारची फसवणूक झाल्याचा आरोप यापूर्वी आयकर विभागाने केला आहे.

अनिल परब यांचे दापोली तालुक्यातील मुरुड येथील साई रिसॉर्ट पाडण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. दापोली तालुक्यातील मुरुड येथे साई रिसॉर्ट हे सीआरझेडचे उल्लंघन करून बांधण्यात आल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता.

याविरोधात न्यायालयीन लढाई सुरु आहे. 'हे रिसार्ट आपले नाही,' असे अनिल परब यांनी वारंवार सांगितले आहे. मात्र, आता परब यांच्यानंतर कदम यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT