Anil Parab-Eknath Ashish Shelar Shinde sarkarnama
मुंबई

Anil Parab News : ‘शेलारांचा मुख्यमंत्री शिंदेंवर विश्वास नाही’, अनिल परबांनी डिवचलं

Ashish Shelar : नालेसफाई झाली नसल्याच्या आरोप आशिष शेलार करतायेत आणि एका बाजुला मुख्यमंत्री पालिकेला क्लिनचीट देत आहेत, असा टोला अनिल परब यांनी आशिष शेलार यांना लगावला.

Roshan More

Maharashtra Politics : मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी नालेसफाईची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करत मुंबईकरांची त्यांना काळजी नसल्याचे म्हटले. शेलार यांनी अनिल परब यांना देखील टार्गेट केले. ठाकरेंचा अनिल परबांना पाठींबा नसल्याचा टोला शेलार यांनी लगावला. शेलारांच्या हल्ल्यावर अनिल परब यांनी पलटवार केला आहे.

नालेसफाई झाली नसल्याच्या आरोप आशिष शेलार करतायेत आणि एका बाजुला मुख्यमंत्री Eknath Shinde पालिकेला क्लिनचीट देत आहेत, असा टोला अनिल परब यांनी आशिष शेलार यांना लगावला. आम्ही सत्तेत नाही पण आम्ही नालेसफाईचे काम किती झाले ते पाहत आहेत. शेलार यांच्या सारखा गाजावाजा करत आम्ही जात नाही. ते सत्तेत आहेत. असे देखील Anil Parab परब म्हणाले.

नालेसफाईचे काम समाधानकारक नाही. मात्र, आत्ताच त्याच्यावर बोलणे घाईचे ठरले. मे महिन्यात शेवटच्या टप्प्यात नेमके काम किती झाले. हे पाहून नेमके काम किती झाले हे ठरवता येईल पण पण आत्तापर्यंत नाले सफाई झाली नाही, असे देखील परब म्हणाले.

...तर सगळे हजर असते

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुष्काळ प्रश्नावर संभाजीनगरमध्ये बैठक घेतली. या बैठकीला मराठवाड्यातील जिल्ह्यांमधील पालकमंत्रीच उपस्थित नव्हते. त्यावरून परब यांनी जोरदार हल्ला चढवला. आता निवडणूका झाल्या आहेत त्यामुळे त्यांना जनतेच्या प्रश्नाशी काही देणंघेणं नाही. दुष्काळापेक्षा ही जर जेंडर काढण्याची बैठक असती तर सगळे हजर असते, असा टोला परब यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT