Mumbai Political News : विधानसभा परिषदेच्या मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांचा दणक्यात विजय झाला आहे. यानंतर मुंबई पदवीधमधून विजयी झालेले आमदार अनिल परब यांनी भाजपवर तोफ डागली आहे. मुंबई आमच्या साहेबांची, नाही कुणाच्या बापाची असे म्हणत परबांनी भाजपला डिवचले.
विजयानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अनिल परब Anil Parab म्हणाले, मुंबई पदवीधर मतदारसंघातून मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीचा उमेदवार होतो. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह असंख्य शिवसैनिकांनी माझ्या विजयासाठी अहोरात्र प्रयत्न केले. आता हा विजय शिवसैनिक आणि पक्षाचा असून तो शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी अर्पण करतो. मला निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी काम केले, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
आभार मानल्यानंतर अनिल परब यांनी भाजपवर सडकून टीका केली. ते म्हणाले, आम्ही नेहमी घोषणा देतो, मुंबई आमच्या साहेबांची, नाही कुणाच्या बापाची. आता ही घोषणा सत्य करून दाखवली आहे. मुंबई पदवीधर असो किंवा शिक्षक मतदारसंघ, तेथे आमच्याच शिवसेनेचा विजय झाला. यावरून मुंबईतील शिक्षकही उद्धव ठाकरेंसोबत असल्याचे सिद्ध झाले.
अनिल परब यांना मुंबई Mumbai पदवीधर मतदारसंघातून 44 हजार 700 मते मिळालेली आहेत. त्यांनी त्यांचे विरोधक असलेले भाजपचे किरण शेलार यांच्यावर तब्बल 26 हजार 26 मतांनी मात केली आहे. हा मताधिक्यांचा पदवीधर मतदारसंघामधील आजवरचा उच्चांक ठरल्याचा दावाही परब यांनी केला आहे.
दरम्यान, मुंबई पदवीधर मतदारसंघात सुमारे दीड लाख मतदार आहेत. ही जागा गेल्या ३० वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात आहे. यंदा हा मतदारसंघ राखण्यासाठी ठाकरे गटापुढे भाजपने मोठे आव्हान उभे केले होते. ठाकरेंचा गड हिसकावण्यासाठी भाजपने किरण शेलार यांच्यामागे सर्व यंत्रणा कामाला लावली होती. या चुरसीच्या लढतीत अखेर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने बाजी मारली.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.