Rahul Gandhi Vs Om Birla : तुम्ही कुणापुढेही झुकू नका! राहुल गांधींचा थेट ओम बिर्लांवर प्रहार, संसदेत काय घडलं?

BJP Vs Congress : संसदेचा सोमवारचा संपूर्ण दिवस राहुल गांधींनी गाजवला. सभागृहात विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी अनेक मुद्द्यांवरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama

Lok Sabha Session 2024 : लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची पुन्हा निवड झाली आहे. त्याबाबत त्यांचे सभागृहात अभिनंदन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी या दोघांनीही बिर्ला यांचे हस्तोंदलन करून अभिनंदन केले. यावेळी बिर्ला यांनी दोघांना वेगवेगळा प्रतिसाद दिला. त्यावरून राहुल गांधींनी थेट बिर्ला यांच्यावरच प्रहार केला.

संसदेचा सोमवारचा संपूर्ण दिवस राहुल गांधींनी गाजवला. सभागृहात विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी अनेक मुद्द्यांवरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी ओम बिर्ला यांनाही सोडले नाही. अभिनंदन करताना बिर्ला पंतप्रधान मोदींसमोर झुकले, अशी टीका राहुल यांनी केली. मात्र ती टीका बिर्ला यांनी खोडून काढण्याचा प्रयत्न केला.

राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान मोदी आणि मी तुमचे हस्तोंदन करून अभिनंदन केले. त्यावेळी तुम्ही दिलेला प्रतिसाद वेगवेगळा होता. मी हातात हात दिला त्यावेळी तुम्ही सरळ उभे राहिलात. मात्र मोदीजींनी तुमच्या हातात हात दिला त्यावेळी तुम्ही तुम्ही झुकलात, हे योग्य नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. यावेळी विरोधकांनी बाके वाजवून निषेध व्यक्त केला.

राहुल यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना बिर्ला म्हणाले, "पंतप्रधान हे सभागृहाचे नेते आहेत आणि माझी मूल्ये सार्वजनिक जीवनात आणि वैयक्तिक जीवनात माझ्यापेक्षा मोठ्या, ज्येष्ठ व्यक्तिांना नमन करण्याची आहेत. तर लहानांना बरोबरीचे स्थान दिल्याचे शिकवतात. या मूल्यांनुसारच मी तुम्हा दोघांचेही अभिनंदन स्वीकारले, असा दावाही बिर्ला यांनी केला.

Rahul Gandhi
Ajit Pawar : अजितदादांचा शरद पवार गटाच्या प्राजक्त तनपुरेंवर डोळा; सभागृहात नेमकं काय घडलं?

बिर्लांनी दिलेल्या उत्तरावर राहुल गांधींचे काही समाधान झाले नाही. तुम्ही जे सांगितले त्याचा मी आदरच करतो. पण मी तुम्हाला सांगतो, की या सभागृहात तुमच्यापेक्षा मोठा कोणीही नाही. तुमचा निर्णय लोकशाहीची मूल्ये जपण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे आम्ही विरोधक सर्वजण तुमच्यापुढे झुकू, नतमस्तक होऊ. तुम्ही मात्र कोणाच्याही पुढे झुकता कामा नये, असे गांधींनी स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान, राहुल गांधींनी हिंदुत्वावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप आणि आरएसएसवर जोरदार हल्लाबोल केला. त्यावेळी पंतप्रधान मोदींना मधेच उभे राहून उत्तर द्यावे लागले. विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधींनी पहिल्या भाषणातून सभागृहात आपली छाप पाडली.

Rahul Gandhi
Video Bhaskar Jadhav : भास्कर जाधवांचे सडेतोड प्रश्न; देवेंद्र फडणवीसांचा थेट गुन्हा दाखल करण्याचा इशारा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com