Anjali Damania On Sanjay Shirsat .jpg Sarkarnama
मुंबई

Anjali Damania On Shirsat: अंजली दमानिया यांचा शिरसाटांच्या व्हिडिओ प्रकरणी मोठा दावा; म्हणाल्या,'व्हिडिओमध्ये जी रूम...'

Sanjay Shirsat News : इन्कम टॅक्स विभागाच्या नोटिशीनंतर संजय शिरसाटांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत ते बेडवर बसून सिगारेट ओढत फोनवर बोलत आहेत. तर बेडखाली पैशांची मोठी बॅग असल्याचं पाहायला मिळत आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News : महायुती सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांच्यापाठीमागचा संकटांचा फेरा सुटता सुटत नसल्याचंच दिसून येत आहे. इन्कम टॅक्स विभागाच्या नोटिशीनंतर आता त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत ते बेडवर बसून सिगारेट ओढत फोनवर बोलत आहेत. तर बेडखाली पैशांची मोठी बॅग असल्याचं पाहायला मिळत आहे. शिरसाट यांच्या या व्हिडिओनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणात आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांची एन्ट्री झाली असून त्यांनी थेट शिरसाटांनाच आव्हान दिलं आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सामाजिक न्यायमंत्री व शिवसेना नेते संजय शिरसाट यांच्या व्हायरल व्हिडिओनंतर सोशल मीडियावरील X प्लॅटफॉर्मवर एक ट्विट केलं आहे. त्या ट्विटमध्ये त्यांनी तो व्हिडीओ माझ्या घरातील आहे, असं म्हणणार्‍या मंत्री संजय शिरसाटांवर जोरदार शा‍ब्दिक हल्ला चढवला आहे.

दमानिया यांचं नेमकं ट्विट काय?

अंजली दमानिया यांनी शुक्रवारी (ता.11) एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्या म्हणतात, मला संजय शिरसाटांची कमाल वाटते. बॅगमध्ये चक्क पैसे दिसत असताना ते पैसे नाहीत, कपडे असतील असे ते म्हणूच कसे शकतात? असा सवाल दमानिया यांनी उपस्थित केला आहे.

तसेच मी त्या व्हिडीओला झूम करून फोटो काढला आहे, असं म्हणत व्हिडिओत दिसत असलेल्या बॅगेत कपडे नव्हे तर पैसेच असल्याचं त्यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ठामपणं सांगितलं आहे.

अंजली दमानिया म्हणाल्या, तो व्हिडिओ माझ्या घरातील आहे,असे संजय शिरसाट म्हणत आहेत. त्यांच्यात हिंमत असेल आणि ते खरं बोलत असतील तर आजच्या आज त्यांनी त्यांच्या घरी माध्यमांना घेऊन जावं आणि व्हिडीओमध्ये जी रूम दिसत आहे ती खरच त्यांच्या घरातील आहे का? हे दाखवून द्यावे,असे खुले आव्हानही दमानिया यांनी मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांना केले.

'ती' गोष्ट चुकीची….

याचदरम्यान,अंजली दमानिया यांनी याचसोबतच मला यात फक्त एक गोष्ट चुकीची वाटत असल्याचं म्हटलं आहे.कोणाच्याही बेडरूममध्ये CCTV लावणं अतिशय चुकीचं आहे,असं मतही दमानिया यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी मंत्री संजय शिरसाट यांच्या व्हायरल व्हिडिओवर टीकात्मक भाष्य केलं.ते म्हणाले, की,गेले दोन-अडीच वर्ष 33 देशांमध्ये गद्दारीची नोंद घेण्यात आली.50 खोके एकदम ओके,त्याच्यातील कदाचित एक आज खोका दिसला असेल.हे व्हिडिओ सगळीकडे फिरत असल्याचं त्यांनी म्हटलं.

तसेच परवा एक गद्दार आमदार मारामारी करताना दिसला.आज एक खोक्यांसोबत बसले आहेत. ते आता बदलून सांगतील की,तिथे महात्मा गांधी छापलेले बनियन होते,बाकी काही त्यात नव्हते. पण,स्पष्टपणे दिसत आहे.ते कॅबिनेट मंत्री आहेत,त्यांच्यावर आरोप झाले असल्याचंही ठाकरेंनी म्हटलं.

संजय शिरसाटांचा खुलासा..?

मंत्री संजय शिरसाट या व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना म्हणाले, तुमच्या चॅनेलच्या एका मित्राकडून मी तो व्हिडीओ पाहिला. व्हिडिओ काय दाखवतोय? माझं घर आहे. जे घर तुम्ही पाहात आहात ते माझ घर आहे, बेडरुम आहे. बेडरुममध्ये मी बसलेलो आहे. बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा आहे. तिथे एक बॅग ठेवलेली आहे.

याचा अर्थ असा होतो की, मी कुठून तरी प्रवासातून आलोय. कपडे काढले आहेत, मी माझ्या बेडवर बसलेलो आहे. अरे मुर्खांनो एवढी मोठी पैशांची बॅग ठेवायची असेल तर कपाटं मेली आहेत का? मी नोटा कपाटात ठोसल्या असत्या. यांना पैशाशिवाय काहीच दिसत नसल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT