Uddhav Thackeray: महाराष्ट्राच्या राजकारणात ऑगस्ट महिन्यात मोठा भूकंप..? उद्धव ठाकरेंच्या बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

Maharashtra Politics : 'एकनाथ शिंदेंना वाचवणाऱ्या शक्ती दिल्लीत कमजोर होताना दिसत आहेत. शिंदेंपेक्षा मला दिल्ली जास्त माहिती आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या कामाची पद्धत मला माहिती नाही. इन्कम टॅक्सची नोटीस मी गांभीर्याने घेत नाही. हा एक इशारा आहे..'
Uddhav Thackeray sanjay raut eknath shinde amit shah .jpg
Uddhav Thackeray sanjay raut eknath shinde amit shah .jpgSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या धर्तीवर राजकीय हालचालीदेखील वाढल्या आहेत. तर दुसरीकडे विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. हे अधिवेशन वादळी ठरत असतानाच येत्या ऑगस्ट महिन्यात मोठी राजकीय उलथापालथ होणार असल्याचा खळबळजनक दावा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यानं केला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी त्यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदेंनाही आयकर विभागाची नोटीस आल्याचं विधान केल्यामुळे संपूर्ण राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. पण काहीवेळातच त्यांनी आपल्या विधानावर घुमजाव घेतला. पण तोपर्यंत एकनाथ शिंदेंच्या गुप्त दिल्ली दौऱ्याची बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली. याचवरुन आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे.

राऊत म्हणाले, एकनाथ शिंदेंना वाचवणाऱ्या शक्ती दिल्लीत कमजोर होताना दिसत आहेत. शिंदेंपेक्षा मला दिल्ली जास्त माहिती आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या कामाची पद्धत मला माहिती नाही. इन्कम टॅक्सची नोटीस मी गांभीर्याने घेत नाही. हा एक इशारा असल्याचेही त्यांनी सांगितलं.

तसेच ऑगस्टच्या अंतापर्यंत याच्यापेक्षा वेगळ्या घडामोडी घडतील, असे संकेत आपल्याला मिळाल्याचंही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं.त्याचमुळे राज्याच्या राजकारणात ऑगस्टमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. शिंदे यांच्या जवळच्या काही लोकांवर भविष्यामध्ये नक्कीच कारवाया होणार असून त्याप्रकारचे पुरावे केंद्रीय तपासयंत्रणांच्या हाती लागल्याचा धक्कादायक दावाही राऊतांनी यावेळी केला.

Uddhav Thackeray sanjay raut eknath shinde amit shah .jpg
Local Body Elections: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठी अपडेट; राज्य निवडणूक आयुक्तांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश

संजय राऊतांनी यावेळी एकनाथ शिंदेंना संरक्षण देणारे दिल्लीतील नेते कमजोर झाले असल्याचंही म्हटलं आहे. राऊतांनी यावेळी दिल्लीतील तुमचे संरक्षक जसजसे कमजोर होतात, अशावेळी तपासयंत्रणा त्यांच्याकडील सगळ्या फाईल्स उघडतात. ते आता हळूहळू सुरु झाले आहे. एकतर तुम्हाला पूर्णपणे शरणागत होऊन सरपटणाऱ्या प्राण्यासारखं सत्तेत राहावं लागेल. नाहीतर बऱ्याच तडजोडी कराव्या लागणार असंही त्यांनी सांगितलं.

मराठी एकजूट महाराष्ट्रात होत आहे.विधानसभा आणि लोकसभेला आपण घोटाळे करुन निवडणुका जिंकलो. पण हा फोर्स असाच राहिला तर अनेक अडचणी निर्माण होतील.त्याचा फटका आपल्या सरकारला आगामी निवडणुकीत बसणार असल्याचं शिंदेंनी शहांना सांगितल्याचंही राऊत यांनी म्हटलं.

Uddhav Thackeray sanjay raut eknath shinde amit shah .jpg
BJP national president : भाजपचे नवे 'राष्ट्रीय अध्यक्ष' मोदी-शहांपेक्षा होणार पॉवरफूल! पक्षप्रमुख कसा निवडला जातो? संघाची भूमिका काय असते?

याचवेळी संजय राऊत यांनी आणखी एक नवा बॉम्ब टाकताना एकनाथ शिंदेंनी अमित शहांना मला मुख्यमंत्री करा, मी हे सगळं मॅनेज करु शकतो. वाटल्यास मी तुमच्या पक्षात येतो,असा प्रस्ताव दिल्याचंही राऊत यांनी केला. याचवेळी त्यांनी मला वाटत नाही,एखाद-दुसरा नेता वगळता एकनाथ शिंदेंना दिल्लीत कोणी संरक्षण देत असेल, असा गौप्यस्फोटही राऊत यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com