Suraj chavhan, ajit pawar, Anjali Damania Sarkarnama
मुंबई

Anjali Damania : "माझे पती 10 वी पास अर्थमंत्री नाहीत..." चव्हाणांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना दमानिया यांचा अजितदादांना टोला

Anjali Damania On Ajit Pawar NCP : भ्रष्टाचाराने महाराष्ट्राची वाट लावली आहे. खिरापत वाटल्याप्रमाणे पवार गट नेत्यांना पैसे वाटले जात आहेत, ते कुठून येतायत. लाडकी बहीण योजनेमुळे लोकांना पैसे मिळावेत आम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही. आम्ही प्रत्येक गोष्टीसाठी टॅक्सच्या माध्यमातून पैसे भरतो म्हणून हे सर्व करता येतं.

Jagdish Patil

Mumbai News, 17 August : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील आरोप-प्रत्यारोपाचा सिलसिला सुरूच आहे. दमानिया त्यांच्या कुटुंबीयांबरोबर परदेशात फिरायला गेल्या होत्या. यावरुनच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते सुरज चव्हाण (Suraj Chavan) यांनी त्यांच्यावर टीका केली होती.

'पाच वर्षात कष्टाच्या पैश्याने किती परदेश दौरे केले ते जनतेला दाखवा.' असं ट्विट करत त्यांनी दमानिया यांच्यावर निशाणा साधला होता. भारतात परतलेल्या दमानिया यांनी 'मी सर्व आरोपांना उत्तर देईन आणि काहींना धडा शिकवेण' असा इशारा दिला होता. त्यानुसार त्यांची पत्रकार परिषदेत घेत चव्हाण यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं.

भ्रष्टाचाराने महाराष्ट्राची वाट लावली आहे. खिरापत वाटल्याप्रमाणे पवार गट नेत्यांना पैसे वाटले जात आहेत, ते कुठून येतायत. लाडकी बहीण योजनेमुळे लोकांना पैसे मिळावेत आम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही. आम्ही प्रत्येक गोष्टीसाठी टॅक्सच्या माध्यमातून पैसे भरतो म्हणून हे सर्व करता येतं. आमच्याकडे प्रत्येक गोष्टीचा हिशेब आहे. आमचे सगळे पैशांचे व्यवहार डिजीटल स्वरुपात करतो.

माझे पती दहावी पास अर्थमंत्री नाहीत

मात्र, तुमच्याकडे शरद पवारांशी फारकत घेतल्यानंतर कुठून पैसा आला? तुमच्या आई बहिणीला रिचार्ज करणारी बाई म्हटलं तर चालेल का? अशा शब्दात दमानिया (Anjali Damania) यांनी चव्हाण यांचा समाचार घेतला. तसंच मी माझ्या उत्पन्नाचा स्रोत दाखवला आता सूरज चव्हाण तुझ्या मालकाला सांग त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत जाहीर करायला, असं म्हणत त्यांनी थेट अजित पवारांना चॅलेंज दिलं.

तर माझे पती दहावी पास अर्थमंत्री नाहीत, असं म्हणत त्यांनी अजित पवारांना (Ajit Pawar) टोला देखील लगावला. तर चव्हाण यांनी रिचार्ज वरील बाई असं म्हटल्यामुळे त्या भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी त्या म्हणाल्या, "अजित पवारांचे चिल्ले पिल्ले असलेले सूरज चव्हाण आणि अमोल मिटकरींनी माझावर खालच्या दर्जाची टीका केली. म्हणून मी पत्रकार परिषद बोलवली.

आम्ही कोण आहोत आम्ही कुठे गेलो, माझ्या उत्पन्नाचे स्त्रोत मागायचे. पण हेच तुम्ही राज्यातील सर्व नेत्यांना मागावेत. माझा महाराष्ट्रीयन कुटुंबात जन्म झाला, गुजराती भाषिक व्यक्तीसोबत लग्न केलं. माझ़ं शिक्षण, माझा पदव्या, माझं डायग्नोस्टिक सेंटर होतं, ज्याची 2015 मध्ये प्रॅक्टिस बंद केलं.

माझाकडे सर्व राजकीय नेत्यांचे डिटेल्स

माझे नवऱ्याकडे 4 पदव्या आहेत ते एक सीए आहेत. देशातून 32 वे असून पास झाल्यानंतर ते नामंकित कंपनीत कामाला आहेत. 2014 ला दहा वर्षापूर्वी मी माझ्या प्रतिज्ञा पत्रात 1 कोटीहून अधिक इनकम दाखवला आहे. यंदाही मी इनकम टॅक्स भरला आहे. 30 लाख महिन्याला आम्हाला मिळतात." दरम्यान, यावेळी त्यांनी विविध कागदपत्र आणि पासपोर्ट देखील दाखवले.

विकास प्रकल्पातील किती टक्के राजकीय नेत्यांकडे जातात याची चौकशी कोण करणार? विकास होतो विकास होतो हे ऐकून आता त्रास होतो. लोक गप्पा मारतात दादा बरोबर की ताई बरोबर. ज्यांच्या विरोधात आम्ही लढलो. त्याच्या विरोधात लढण्यात अर्थ नाही हे ओळखून आम्ही आता लढणं कमी केलं आहे. अजित पवार यांची गुलाबी यात्रा पाहिली. पक्षात 40 गाड्या वाटल्या त्यासाठी पैसे कुठून आले? असा सवाल करत माझाकडे सर्व राजकीय नेत्यांचे डिटेल्स असल्याचंही दमानिया यांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT