Manoj Jarange Patil And AAP: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 'आप'ची 'एन्ट्री'; पहिला डाव अंतरवाली सराटीतूनच टाकणार?

AAP Party delegation Meet Manoj Jarange Patil : आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत आप उतरणार असल्याची चर्चा आहे.त्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलून धरत विधानसभा निवडणुकीत फायदा उचलण्याची शक्यता आहे.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Jalna News : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठा लढा उभारला आहे. गेल्या वर्षभरात त्यांनी बेमुदत उपोषण,मोर्चे,रॅली,विराट सभा यांनी सरकारची डोकेदुखी वाढवतानाच आरक्षण मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले आहेत. लोकसभा निवडणुकीत मराठा फॅक्टरचा महायुतीला चांगलाच फटका बसला. आता आगामी विधानसभा निवडणुकीआधीही राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.

एकीकडे महायुतीने मराठा फॅक्टरचा धसका घेतलेला असतानाच दुसरीकडे महाविकास आघाडी याच परिस्थितीचा पुन्हा एकदा फायदा उचलण्याच्या तयारीत आहे.अशातच आता आम आदमी पक्षही मराठा आरक्षणावरुन मोठा डाव टाकणार असल्याचे बोलले जात आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांच्या नेतृत्वाखाली आप पक्षाने दिल्ली,पंजाबसारख्या राज्यात सत्ता काबीज केली. तसेच राजस्थान,मध्य प्रदेश यांसह इतर राज्यांच्या निवडणुकीत आम आदमी पक्ष मैदानात उतरले होते.

आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत आप उतरणार असल्याची चर्चा आहे. त्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलून धरत विधानसभा निवडणुकीत फायदा उचलण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुका नोव्हेंबरमध्ये होणार असल्याची चर्चा आहे.

Manoj Jarange Patil
Vijay Wadettiwar : रामगिरी कसला संत? विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार संतापले

आम आदमी पक्षाने महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. मात्र, नोव्हेंबरमध्ये होत असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आपची एन्ट्री होण्याची शक्यता आहे.आम आदमी पार्टीचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत दाखल झाले आहे. यात कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील यांच्यासह आपचे पदाधिकारी जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि आपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये विधानसभा निवडणुकीविषयी चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.आपचे नेते अरविंद केजरीवाल यांचा निरोप घेऊन हे शिष्टमंडळ अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले आहे. जर विधानसभेला आपची एन्ट्री झाली तर महायुती आणि महाविकास आघाडीचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.

Manoj Jarange Patil
Marathwada News : मागील 40 वर्षांपासून आमच्यावर अन्याय..., महादेव कोळी समाजाने जरांगे-पाटलांसमोर मांडली व्यथा

'...तर तुमचा सुपडा साफ होईल!'

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावरुन सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. ते म्हणाले, मला व समाजाला राजकारणात जायचे नाही. मला त्यामध्ये ढकलू नका. मी जर गेलो तर तुम्ही बांधलेले गणित सगळे चुकणार आहेत. मला राजकारणात पाय ठेवायला लावू नका. मी राजकारणात आलो तर तुमचा सुपडा साफ होईल. माझी राजकारणात यायची अजिबात इच्छा नाही. मी जर एकदा त्यामध्ये पडलो तर परिणामाची चिंता करत नसल्याचे सांगत त्यांनी राज्यातील राजकारण्यांना इशारा दिला.

राज्यातील परिस्थिती येत्या 20 ऑगस्टपर्यंत बदलेली दिसेल. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी काही गणित बांधली आहेत. ती येत्या काळात फेल होणार आहेत. त्यामुळे त्यांना जर समजून घ्यायचे नसेल तर माझाही नाईलाज असल्याचेही जरांगे पाटील यांनी आपल्या भाषणातून वारंवार सांगितलेले आहे.

Manoj Jarange Patil
Rohit Pawar : 'असे मोर्चे गुजरातमध्ये का निघत नाहीत, महाराष्ट्रातच का?' नाशिक, संभाजीनगरमधील घटनेवरून रोहित पवारांचा सवाल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com