Mumbai News, 11 Feb : नुकतेच दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले. या निकालात भाजपने जवळपास 27 वर्षांनंतर दिल्लीचं तख्त काबीज केलं. तर सत्ताधारी भाजपचा दिल्लीतून (Delhi Election Result) सुपडासाफ झाला. भाजपने 70 पैकी 48 जागा जिंकतं एकहाती सत्ता मिळवली. तर माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला 22 जागांवर समाधान मानावे लागले.
आपचा दिल्लीतील गड उद्ध्वस्त होताच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर खोचक शब्दात टीका केली होती. केजरीवालांच्या डोक्यात पैशाची, सत्तेची हवा गेली. त्यांनी दारूवर लक्ष केंद्रीत केल्यामुळे त्यांचा पराभव झाला, अशी प्रतिक्रिया हजारे यांनी दिली होती.
त्यांच्या या वक्तव्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि खासदार संजय राऊत यांनी अण्णा हजारेंवर टीका केली होती. दिल्ली विधानसभेचा निकाल हा खोटा पराभव असून तो निकाल मी मानत नाही. दिल्लीत केजरीवालांचा पराभव झाला तेव्हा काहींनी झोपेतून उठून प्रतिक्रिया दिली, असं म्हणत ठाकरेंनी अण्णा हजारे यांचं नाव न घेता टीका केली होती.
त्यांच्या याच टीकेवर अण्णा हजारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, "पत्रकारांनी प्रश्न विचाराला म्हणून मी उत्तर दिलं. नाहीतर मी कधी बोलत नाही. पण सर्व पत्रकारांनी त्याची प्रशंसा केली. एखादा माणूस चुकला असेल तर चुकू द्यायचं. आपण कशाला त्यावर बोलायचं?"
तर यावेळी त्यांनी राऊतांच्या टीकेचा देखील अण्णा हजारेंनी समाचार घेतला. "ज्या रंगाचा चष्मा असतो, त्या रंगाचं जग दिसते. चष्माच त्या रंगाचा असल्यामुळे जग तसंच दिसणार, त्यावर आपण कशाला काय बोलायचं," अशा शब्दात त्यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलं.
दिल्लीच्या निकालावर अण्णा हजारेंनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, "अण्णा हजारेंना महात्मा करण्याचं काम अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांनी केलं नाहीतर त्यांनी कधी दिल्ली बघितली असती?
रामलीला मैदान, जंतर-मंतर रोड कधी पाहिला असता? त्यावेळच्या आंदोलनानंतर ते देशाला माहिती झालेनाही तर ते राळेगणचे दैवत होते. महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचे इतके स्फोट झाले त्यावेळी अण्णांनी राळेगणमध्ये कूसही बदलली नाही. ते भ्रष्ट सरकारच्या बाजूने उभे राहिले. अण्णा हजारेंची भूमिका संशयास्पद आहे."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.