Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून शरद पवारांचं तोंडभरून कौतुक; म्हणाले, "त्यांनी शेजारी बसलेल्यांवर गुगली टाकली, पण..."

Eknath Shinde And Sharad Pawar Political Relations : शिवसेनेचे (शिंदे गट) मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंगळवारी (ता.11) रोजी जेष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देण्यात आला.
Sharad Pawar, Eknath Shinde
Sharad Pawar, Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

Navi Delhi News, 11 Feb : शिवसेनेचे (शिंदे गट) मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मंगळवारी (ता.11) जेष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार देताना केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे देखील उपस्थित होते.

या पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना एकनाथ शिंदे यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांचं तोंड भरून कौतुक केलं. शिवाय त्यांनी शरद पवारांनी राजकारणात अनेकांना गुगली टाकली पण मला कधीही टाकली नाही. तसंच ते भविष्यातही मला गुगली टाकणार नाहीत असा विश्वास असल्याचं शिंदे म्हणाले.

सरहद, पुणे आयोजित अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सन्माननीय व्यक्तींचा गौरव करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देण्यात आला.

Sharad Pawar, Eknath Shinde
Chandrakant Khaire On BJP : भाजपला ओरिजनल ठाकरेंशिवाय पर्याय नाही; राज-फडणवीस भेटीवर चंद्रकांत खैरेंचा टोला!

यावेळी बोलताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, हा मराठी जणांचा सन्मान सोहळा आयोजित केला आहे. मला महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार (Mahadji Shinde Rashtra Gaurav Award) दिला ते आपल्या सर्वांचे लाडके माजी कृषीमंत्री शरद पवार आणि महापराक्रमी महादजी शिंदेंचे थेट वंशंज ज्योतिरादित्य शिंदे यांनी. हा पुरस्कार स्वीकारताना मनात थोडा संकोच होता. पण ज्या आपुलकीने पुरस्कार दिला त्याबद्दल मी धन्यवाद देतो.

महापराक्रमी महादजी शिंदेंच्या नावाने पुरस्कार दिला त्यामुळे थोड दडपण होतंच. परंतु या सन्मानापेक्षा येणारी जबाबदारी मोठी आहे याची जाणीव देखील मला आहे. ज्योतिरादित्य शिंदे याचा पुण्य भूमित जन्म झाला तिथेच माझा जन्म झाला. मी एक कार्यकर्ता आहे. ज्यांनी पुरस्कार दिला त्यांचं आडनाव पवार असलं तरीसुद्धा ते देशाचे थोर क्रिकेटपटू सदाशिव शिंदे यांचे जावई आहेत, अशी ओळख करून देत त्यांचाही शिंदे नावाशी संबंध असल्याचं सांगितलं.

Sharad Pawar, Eknath Shinde
SSC HSC Exam : 10-12 वी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर CM फडणवीसांचा मोठा निर्णय! 'त्या' शिक्षक आणि शाळांची धडधड वाढवली

एकनाथ शिंदे म्हणाले, सदू शिंदे भारताचे स्पीनर होते. त्यांची गुगली भल्याभल्यांना कळत नव्हती. पवारसाहेबांची देखील राजकारणातील गुगली अनेकांना कळत नाही. कधीकधी शेजारी बसलेल्या लोकांना पण ते गुगली टाकतात. पण माझ्याबद्दल थोडं वेगळं सांगतो. शरद पवारांचे आणि आमचे प्रेमाचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत.

त्यांनी माझ्याबद्दल कधी गुगली टाकली नाही आणि यापुढे टाकणार नाहीत असा विश्वास आहे, असं म्हणत त्यांनी पवारांचं दिल्लीतून कौतुक केलं. दरम्यान, यावेळी त्यांनी महादजी शिंदे यांनी पानिपतच्या युद्धानंतर दहा वर्षात दिल्लीवर भगवा फडकवला. तसंच ८ तारखेला दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवला असं म्हणत त्यांनी भाजपच्या दिल्लीतील विजयाची आठवण करून दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com