Shinde- Fadanvis Dispute : शिंदे आणि फडणवीसांचा घटस्फोट होण्याचा मार्गावर आहे. भाजपच्या एका मोठ्या नेत्याने मला शिवसेनेच्या मराठवाड्यातील एका बड्या मंत्र्याचे कागदपत्र माझ्याकडे आणून दिले आहेत. मंत्री अब्दुल सत्तार यांच्यानंतर मराठवाड्यातीलच आणखी एका नेत्याला कसं टार्गेट केलं जाईल, हे तुम्ही बघत राहाल. ही फक्त चुणूक होती, असा धक्कादायक गौप्यस्फोट ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केला आहे.
जेव्हा बाळासाहेब होते तेव्हा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे.पी. नड्डा हेदेखील मातोश्रीवर येत होते. मातोश्रीतील माणूस कधीही तिकडे जात नव्हता. पण आजही मातोश्रीचा तो वकूब आजही कायम आहे. आजही देशभरातील लोक मग ते मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल असोत वा मुख्यमंत्री भगवंत मान, तेजस्वी यादव, के.सी वेणू गोपाल असोत. हे सर्व आजही मातोश्रीवर येतात. (Shivsena Melava)
वर्धापन दिनाच्या निमित्ताने मी सांगू इच्छिते की, पुढच्या वर्धापन दिनाला आम्ही विरोधा बाकावर नाही तर सत्तेतले शिवसैनिक म्हणून इथे उभे असून. त्यासाठी आम्ही जिवाचं रान करत राहू. अशी ग्वाही सुषमा अंधारे यांनी दिली. याचवेळी त्यांनी कार्यक्रमात आमदारांचे आभारही मानले. (Shinde- Fadanvis Politics)
तसेच, 'ज्यांच्यात समोरा समोर भिडायची हिंमत नसते ते मागून वार करतात, आणि मागून वार करणाऱ्याला लांडगे म्हणतात. अशा शब्दातं त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी अयोध्या पौळ यांच्यावर झालेल्या हल्ल्याचाही निषेध केला.
पंधरा दिवसांपूर्वी मी म्हटलं होते. भाजपच्या एका बड्या नेत्याने मला मराठवाड्यातील शिंदे गटाच्या मंत्र्याची कागदपत्र पुरवली होती. पण दुसऱ्याने आणून दिलेल्या शिकारीवर आम्ही झडप मारत नाही. त्यावेळी त्यांना ते खोटं वाटत होतं. पण अब्दुल सत्तार साहेबांचं प्रकरण समोर आल्यावर खात्री पटली असेल. आज पुन्हा एकदा सांगते, भाजपच्याच एका बड्या नेत्याने मराठवाड्यातील शिंदे गटाच्या एका बड्या मंत्र्याची कागदपत्रे माझ्याकडे पाठलेली आहेत. शिंदे आणि फडणवीसांचा घटस्फोट होण्याचा मार्गावर आहे. जर अजूनही खात्री पटत नसेल तर आठ दिवसात सत्तार साहेबांनंतर मराठाड्यातल्याच एका मंत्र्याला कसं टार्गेट केलं जाईल हे तुम्ही बघत रहाल. ही फक्त माध्यमांसाठी चुणूक होती. असा धक्कादायक गौप्यस्फोट सुषमा अंधारे यांनी केला आहे.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.