Shivsena News: आता साताऱ्याचा आमदार रडारवर.. बदलीसाठी दीड कोटीचा व्यवहार कोण करतंय?; अंधारेंचा निशाणा कोणावर

Sushma Andhare News: प्रवीण दरेकर आणि इतर नेते सक्रीय झाले आहेत. त्यांना वाटतंय की आता गुळाच्या गणपतीचे विसर्जन झाले पाहिजे.
Sushma Andhare
Sushma AndhareSarkarnama
Published on
Updated on

Dispute Shivsena-BJP News : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज अनेक गौप्यस्फोट केले. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रकरणांची कागदपत्रं माझ्याकडे एका भाजप नेत्याकडून आली होती, असे स्पष्ट केले. त्यानंतर मराठवाड्यातील शिंदे गटातील एक मातब्बर मंत्र्याचा नंबर लागणार असून त्याचीही कागदपत्रं बाहेर येणार आहेत, असे सांगितले. तसेच, सातारा जिल्ह्यातील एका आमदाराचंही प्रकरणही रडारवर आहे, असल्याचे सांगून बदलीसाठी दीड कोटीचा व्यवहार कोण करतंय, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. (IN Satara MLA is on radar...who is doing transaction of 1.5 crore for transfer : Sushma Andhare)

सुषमा अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या की, कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्याबाबतची कागदपत्रं माझ्याकडे एका भाजपच्या (BJP) नेत्याकडून आली होती. मात्र मी त्यावेळी सांगितलं होतं की, आम्ही आमची शिकार स्वतः करतो. लोकांनी आणून दिलेल्या शिकारीवर आम्ही झडप मारणार नाही. भाजप आम्हाला मॅनिप्लेट करत असेल, तर आम्ही मॅनिप्लेट होणारे नाहीत. भाजप आणि शिंदे गटाने (Eknath Shinde) काय असेल ते आपापसांत मिटवावे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना अंधारे यांनी हे गौप्यस्फोट केले आहेत

Sushma Andhare
Maharashtra Government : लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांची मंत्रालय वारी....कसे येईल शासन आपल्या दारी...?

मराठवाड्यातील आणखी एका कॅबिनेट मंत्र्याचा लवकरच नंबर लागणार आहे. त्याचीही कागदपत्रं बाहेर येणार आहेत. ती माझ्याकडं तर आलीच आहेत. तसेच, कोणाच्या ना कोणाच्या मार्फत पावसाळी अधिवेशनात चर्चेला येणार आहेत. मराठवाड्यातील शिंदे गटातील हा मातब्बर मंत्री आहे, तो रडारवर आहे आणि त्याची कागदपत्रं लवकरच येणार आहेत, असेही अंधारे स्पष्ट केले.

Sushma Andhare
Sahakar Shiromani Result : मतमोजणीवेळी अभिजीत पाटलांची गाडी फोडली; काळे म्हणतात, ‘हे तर स्टंटबाजीचे....’

त्या म्हणाल्या की, या सरकारमध्ये सर्व घोटाळेच घोटाळे आहेत. आणखी एक प्रकरण रांगेत आहे. ते सातारा जिल्ह्यातील एका आमदाराचं आहे. सातारा जिल्ह्यात किती आमदार आहेत, ते तुम्ही शोधा. काय काय चाललं आहे, ‘डीसीएम’कडं कोण जातंय. तिकडे किती बदल्यांचे गैरव्यवहार चाललेत. बदलीसाठी दीड कोटींचा बदलीचा व्यवहार कोण करत आहे. ती बदली कोणाची होणार आहे. जिल्हा परिषदेतून एक इंजिनिअर थेट कार्यकारी अभियंता म्हणून पुण्याला नेमायचा आहे. या सर्वाची चौकशी डीसीएम यांनी करावी.

Sushma Andhare
Sahakar Shiromani Result : विजयानंतर कल्याणराव काळेंचा अभिजीत पाटलांवर हल्लाबोल; ‘विरोधकांची गुर्मी उतरवली...’

गुळाचा गणपती कोण?

दुसऱ्या मंत्र्याची कागदपत्रंसुद्धा भाजपच्या लोकांकडून आलेली आहेत. मी त्याला नकार दिला तर ते म्हणतात की घ्या ताई. पावसाळी अधिवेशनात कुणाच्या तरी मार्फत आम्ही ती काढू. शिवसेनेने दिलेली ती जाहिरात भाजपच्या जिव्हारी लागलेली आहे. या सरकारचे शिल्पकार हे देवेंद्र फडणवीस आहेत, जर त्यांचंच फुटेज कमी दाखवलं जात असेल आणि एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता २६ टक्के, देवेंद्र फडणवीसांची २३ टक्के दाखवली गेल्यामुळे फडणवीसांचे समर्थक प्रचंड नाराज झाले आहेत. त्यामुळे प्रवीण दरेकर आणि इतर नेते सक्रीय झाले आहेत. त्यांना वाटतंय की आता गुळाच्या गणपतीचे विसर्जन झाले पाहिजे, असेही सुषमा अंधारे यांनी नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com