CM Eknath Shinde  Sarkarnama
मुंबई

CM Eknath Shinde News: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार आणखी एक पॅकेज; मुख्यमंत्री करणार घोषणा!

Unseasonal Rain : शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी सरकार विशेष पॅकेज जाहीर करण्याची शक्यता.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News: राज्यातील अनेक जिल्ह्यात दुसऱ्यांदा अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. गारपिटीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या झालेल्या नुकसानीची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (दि.11 एप्रिल) केली‌.

यानंतर एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, यासाठी युद्धपातळीवर पंचनामे करण्यात येऊन एका आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात मदत वितरित करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी अहमदनगर दौऱ्यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना दिली.

राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबीनेटच्या बैठकीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळण्याबाबत सकारत्मक चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सर्व पंचनामे एका आठवड्यात केले जातील. तसेच झालेल्या नुकसानीचा मोबदला लवकरच दिला जाईल, अशी चर्चा आजच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीत झाली आहे.

तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी सरकार विशेष पॅकेज जाहीर करण्याची घोषणा मुख्यमंत्री करणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आणखी एक पॅकेज लवकरच मिळणार आहे.

(Edited By Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT