Hasan Mushrif Sons Got Relief : हसन मुश्रीफ यांच्या तीनही मुलांना अटकेपासून संरक्षण; कोर्टात काय झालं?

Hasan Mushrif News : मुश्रीफ घेणार उच्च न्यायालयात धाव
Hasan Mushrif
Hasan MushrifSarkarnama
Published on
Updated on

Hasan Mushrif And ED : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, आमदार हसन मुश्रीफ यांची मनी लाँड्रींगप्रकरणी 'ईडी'ची कारवाई सुरू आहे. याच प्रकरणात त्यांच्या तीनही मुलांवर गुन्हा दाखल आहे. दरम्यान आमदार मुश्रीफांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. दरम्यान, आज त्याच न्यायालयाने मुश्रीफांच्या तीनही मुलांना तात्पुरता दिलासा दिला आहे.

Hasan Mushrif
Congress News : ओबीसी ग्रामीण जिल्हयाध्यक्षांचा दोन महिन्यांत 'गेम', काँग्रेसची वज्रमुठ सुटतेय?

आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यांवर मनी लाँड्रींगप्रकरणी 'ईडी'ने खटाला दाखल केला आहे. याच प्रकरणात साजीद, आवेद आणि नावेद या त्यांच्या मुलांचाही समावेश असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्याविरोधात या मुश्रीफ पिता-पुत्रांनी जामीन अर्ज केला आहे.

दरम्यान, मंगळवारी (ता. ११) मुंबई सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे. त्याच प्रकरणावर त्यांच्या तीन मुलांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झालेली आहे. मात्र युक्तीवाद सुरू आहे. पुढील युक्तीवाद २० एप्रिल रोजी होणार आहे. तोपर्यंत या तिघांनाही 'पीएमएलए' कोर्टाने अटकेपासून दिलेले संरक्षण या कोर्टानेही कायम ठेवले आहे. तोपर्यंत तपास यंत्रणेने कुठलीही कारवाई करू नये असे निर्देश दिलेले आहेत.

Hasan Mushrif
Ajit Pawar's Reaction: भाजपबरोबर जाणार का? अंजली दमानियांच्या दाव्यावर अजितदादांची एका वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले…

दरम्यान जामीन अर्ज फेटाळल्याने आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या अडचणी वाढ झाली आहे. मुश्रीफ जामीन फेटाळण्यांच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान देतील. यावर उद्या (ता. १३) तातडीची सुनावणी होण्याची शक्यता आहे. तर न्यायालयाच्या आदेशाने मुश्रीफ बंधूंना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. त्यांच्यावरील आरोपांबाबत पुढील सुनावणी २० एप्रिल रोजी होणार आहे. तोपर्यंत मुश्रीफ बंधूंवर कुठल्याही प्रकरणाची मोठी कारवाई न करण्याच आदेश तपास यंत्रणांना न्यायालयाने दिले आहे.

Hasan Mushrif
Rapper Ram Mungase Bail : 'गुवाहाटीचे चोर आले, 50 खोके घेऊन..' रॅपर राज मुंगासेला जामीन मंजूर : दानवेंची माहिती

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल (Kagal) विधानसभा मतदारसंघाचे आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी गुन्हा दाखल आहेत. त्या प्रकरणी 'ईडी' तपास करत आहे. ED 'ईडी'ने मुश्रीफांच्या घर, कार्यालयावर छापे टाकले होते. साखर कारखान्यातील भ्रष्टाचारप्रकरणी मुश्रीफ यांना 'ईडी'ने तीनवेळा चौकशीसाठी बोलावले होते. गेल्या अडीच महिन्यात 'ईडी'कडून मुश्रीफ यांच्या संपत्तीवर तीन वेळा छापेमारी करण्यात आली आहे. मुश्रीफ यांचे जवळचे व्यावसायिक भागीदार आहेत, त्यांचीही चौकशी सुरू आहे. त्यांची कसून चौकशी केली जात असल्याने मुश्रीफ यांच्यापुढील अडचणी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com