शिवसेना-भाजपमधील युती तुटल्यानंतर आणि महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची दोस्ती कायम आहे का, असा प्रश्न नेहमी विचारला जातो. त्यावर खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच उत्तर दिलं आहे. फडणवीस म्हणाले, पाच वर्षे आम्ही एकत्र होतो, कधीही एकमेकांशी बोलायचो, चर्चा करायचो. पण त्यांनी दरवाजे बंद केले आहेत. (Friendship of Uddhav Thackeray and Devendra Fadnavis)
एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांना उद्धव ठाकरेंसोबतच्या मैत्रीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर कधी भेटलो तर बोलतो, विचारपूस करतो, असं उत्तर फडणवीसांनी दिलं.
आजही तुमची आणि उद्धव ठाकरेंची मैत्री आहे का? यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्टच सांगितलं, उद्धव ठाकरे माझे मित्र होते. आता ते मित्र आहेत की नाही, हे त्यांनाच विचारायला हवं. एखादी गोष्ट पटत नसेल तर मित्र थेट सांगतो. आघाडीची चर्चा सुरू असताना मी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) सारखे फोन करत होतो आणि ते फोन घेत नव्हते. काहीही सांगत नव्हते. त्यांनी दरवाजे बंद केले. आपण एकत्र येऊ शकत नाही, हे सांगण्याचं सौजन्यही त्यांनी दाखवलं नाही, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.
युती सरकारमध्ये मी मुख्यमंत्री होतो. तेव्हा उद्धव ठाकरे आणि मी कधीही बोलायचो. ते जे सांगायचे ते मी करायचो. पण महाविकास आघाडी (MVA) बनत असताना त्यांनी दरवाजे बंद केले. उद्धव ठाकरे मित्र आहेत की नाही हे त्यांना विचारायला हवं, असं उत्तर फडणवीसांनी दिलं. कारण त्यांनी रस्ते बंद केले, दरवाजा त्यांनी बंद केला आणि सौजन्यही दाखवलं नाही.
असं असलं तरी आजही कधी समोरासमोर आलो तर भेटतो, विचारपूस करतो कारण ही आपली महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे. पण आमच्यात संवाद नाही, हे ही फडणवीसांनी स्पष्ट केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
त्याचवेळी आणखीही एक बाब देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केली. इथं केवळ राजकीय मतभेद नव्हते तर मनभेदही आहेत. त्यांच्या रोजच्या मोदींविरोधी (Narendra Modi) वक्तव्यांमुळे मनेही दुखावली गेली आहेत. आजही ते मोदींना अपशब्द वापरतात. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत 10-20 अपशब्द ते वापरतात, असा आरोप फडणवीसांनी केला.
या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांचं नाव न घेता त्यांचा उल्लेख भोंगा असा केला. आता तर ठाकरेंनी काही लोक सोडलेत ज्यांचा भोंगा सकाळी 9 वाजता सुरू होतो. ते शिव्या देण्याचं काम करतात. या सगळ्यांमुळे मनेही दुखावली गेलीत, असं फडणवीसांनी स्पष्ट केले.
(Edited by Avinash Chandane)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.