Shinde Vs Thackeray Group : शिंदे गटाची राजकीय खेळी; ठाकरेंना रोखण्यासाठी आखली मोठी रणनीती

Shiv Sena Yuvasena Camp : शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेनेचं 24 फेब्रुवारीला ठाण्यात महाशिबिर आयोजित करण्यात आले असून, या शिबिरात मुख्यमंत्री शिंदे संबोधित करणार आहेत.
Uddhav Thackeray, Aditya Thackeray, Shrikant Shinde, CM Eknath Shinde
Uddhav Thackeray, Aditya Thackeray, Shrikant Shinde, CM Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : लोकसभा निवडणूक तोंडावर आल्यामुळे सर्वच रजकीय पक्षांनी संघटनेच्या बांधणीसाठी कंबर कसली आहे. यासाठी सभा, मेळावे, शिबिरं घेत रणनीती आखण्यात येत आहे. शिवसेना शिंदे गटाचं महाअधिवेशन काही दिवसांपूर्वीच कोल्हापूरमध्ये पार पडले. यानंतर आता 24 फेब्रुवारीला शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेनेचं ठाण्यात शिबिर आयोजित करण्यात आले आहे. (Shiv Sena Shinde group Yuvasena camp)

पुर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली हे युवासेनेचं शिबिर पार पडणार आहे. या शिबिरात युवा सैनिकांना खासदार श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संबोधित करणार आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेनेचे हे महाशिबिर म्हणजे ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना रोखण्यासाठी रणनीती असल्याचं बोललं जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Uddhav Thackeray, Aditya Thackeray, Shrikant Shinde, CM Eknath Shinde
Lok Sabha Election 2024 : लोकसभेला भाजपला जास्त जागा? किर्तीकर आक्रमक; केसरकर म्हणाले...

काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) आणि आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात दौरे करत थेट ललकारले होते. शिवसेनेतील फुटीनंतर आदित्य ठाकरे हे विविध विभागाचे दौरे करत युवा सेनेची मोट बांधत आहेत. विशेषत: आदित्य यांनी या माध्यमातून मुंबईत पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. आता आदित्य ठाकरेंना रोखण्यासाठी आणि मुंबईत शिवसेना शिंदे गटाच्या युवासेनेची ताकद वाढवण्यासाठी युवासेना मैदानात उतरवणार असल्याचं बोललं जात आहे.

या पार्श्वभूमीवरच पुर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली हे शिबिर पार पडणार आहे. या शिबिरासाठी राज्यभरातील विविध जिल्ह्यांतून युवा कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या माध्यमातून युवासेना राज्यभरात आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र, या शिबिरात आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) युवा सैनिकांना काय कानमंत्र देतात, ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

R

Uddhav Thackeray, Aditya Thackeray, Shrikant Shinde, CM Eknath Shinde
Loksabha Election 2024 : फडणवीस नायतर वरचा कोणीही येऊ दे, मी घाबरत नाय! काँग्रेसच्या 'या' नेत्यानं थेट फडणवीसांना दिलं आव्हान

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com