Supriya Sule News : Supriya Sule On Ajit Pawar Press Conference : Sarkarnama
मुंबई

Supriya Sule News : 'काहीही झालं तरी बिचाऱ्या दादांवरच खापर फुटतं' ; सुप्रिया सुळेंची उद्विग्न प्रतिक्रिया !

Supriya Sule On Ajit Pawar Press Conference : 40 आमदार कशाबद्दल नाराज आहेत? या गोष्टीत काहीच तथ्य नाही!

सरकारनामा ब्यूरो

Supriya Sule News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषेदेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत जाणार अशा चर्चांची वावदूक उठली होती. आता स्वत: अजित पवारांनी या सर्व चर्चांमध्ये काही तथ्यं नसल्याचे सांगत, चर्चांना पूर्णविराम दिले आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे यांची देखील प्रतिक्रिया आली आहे. "माझ्या बिचाऱ्या दादाचं असं झालंय की, काहीही झालं तरी खापर हे दादावरच फोडतात, असे सुळे म्हणाल्या.

अजित पवार यांनी आपल्या सर्व सोशल मीडिया अकाऊंट्सवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह हटवले आहेत, अशी बातमी येत होती. यावर बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'अजितदादांचं ट्विटर मी अजून पाहिलेलं नाही. ते मी तपासून सांगतो. 40 आमदार कशाबद्दल नाराज आहेत? या गोष्टीत काहीच तथ्य नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. (Latest Marathi News)

अशा चर्चांबद्दल मी काही सांगू शकत नाही. तुमचा सेटअप मोठा असेल तर तो विधानभवनात लावा आणि बघा दादा काय करतात, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. "काहीही झालं तरी खापर हे माझ्या दादांवरच फोडतात, असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं. (Political News)

अजित पवार काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना शरद पवार यांनी स्वाभिमानातून केली आहे. त्यावेळेपासून पक्ष कधी सत्तेत होता कधी नव्हता. या चढ-उताराच्या काळात आम्ही सर्वांनी पक्षवाढीसाठी एकदिलाने काम केले. यापुढेही जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करत राहणार आहे. मी पक्षात राहणार असून इतर कुठल्याही पक्षात जाणार नाही. तसे आता अॅफिडेव्हीट करून देऊ का? असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT