Pune News : 'पीएफआय'चं पुण्यातलं प्रशिक्षण केंद्र सील : इस्लामिक राजवट आणण्याचा आरोप..

PFI Center Seal In Pune : निष्पाप मुस्लिम तरुणांना या ठिकाणी भरती केली जात असल्याचा दावा
PFI News :
PFI News : sarkarnama
Published on
Updated on

PFI Center Seal In Pune : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आता पुणे (Pune News) शहरातील पुण्यातील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे (पीएफआय) प्रशिक्षण केंद्र सील केले आहे. या ठिकाणी मुस्लिम तरुणांना कट्टरपंथी बनवण्यासाठी शिबिरे आयोजित करत असल्याचा दावा एनआयएने केला आहे.

PFI News :
Nana Patole News : काँग्रेस देशभरात ‘नरेंद्र मोदी जवाब दो’ आंदोलन करणार! नाना पटोलेंची पुण्यात मोठी घोषणा

पीएफआयकडून भारताची एकता, अखंडता आणि सुरक्षा धोक्यात आणण्याच्या उद्देशाने दहशतवादी कारवाया करण्याची योजना आखण्यासाठी ब्लू बेल इमारतीच्या दोन मजल्यांचा वापर केला गेला. २०४७ पर्यंत देशात इस्लामिक राजवट स्थापन करण्यास विरोध करणाऱ्यांना संपवण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देत होते. निष्पाप मुस्लिम तरुणांना या ठिकाणी भरती केली जात असल्याचा दावा एनआयएने (NIA) केला आहे.

PFI News :
Ajit Pawar On Sanjay Raut : तुमच्या पक्षाचं बघा; आमच्याबद्दल का बोलता? अजितदादांनी राऊतांना सुनावलं !

एनआयएने एका प्रकरणात यूए (पी) कायदा, १९६७ च्या तरतुदींनुसार दोन मजले 'दहशतवादाची कारवाई' म्हणून संलग्न केले आहेत.एनआयएने गतवर्षी २२ सप्टेंबर रोजी शाळेच्या आवारातील दोन मजल्यांची झडती घेतली होती. एजन्सीने दस्तऐवज जप्त केले होते.

या मालमत्तेचा वापर आरोपींनी केडरसाठी शस्त्र प्रशिक्षण आयोजित करण्यासाठी केला. ते पीएफआयशी संबंधित असल्याचे आढळले. निरपराध मुस्लिम तरुणांना सरकार, तसेच विशिष्ट समुदायाचे नेते आणि संघटना यांच्याविरुद्ध भडकावण्याचे व्यासपीठ म्हणून ते काम करत होते, असे एनआयएने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com