Maharashtra Bhushan Award Sarkarnama
मुंबई

Maharashtra Bhushan : महाराष्ट्र भूषण पुरस्काराची जय्यत तयारी; पाच लाखापेक्षा जास्त लोक : अमित शाहांची उपस्थिती अन् मुख्यमंत्र्यांचे नियोजन

Amit Shah News : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते अप्पासाहेब धर्माधिकारी यांना पुरस्कार दिला जाणार आहे.

ज्ञानेश सावंत : सरकारनामा

Maharashtra Bhushan Award News : भाजपचे (BJP) बहुबली नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना मुंबईत आणून महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा दिमाखदार सोहळा भरविलेले, या सोहळ्याला गर्दीचा उच्चांक चढविण्याची रणनीती आखलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कार्यकमाच्या तयारीवर शेवटीची नजर फिरवली.

शाह यांच्या राजकीय ताकदीला आणि पुरस्कार विजेते डॉ. दत्तात्रेय नारायण ऊर्फ अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या कर्तुत्वाला शोभेल, या पद्धतीने आखलेल्या नवी मुंबईतील कार्यक्रमाची जोरदार तयारी केल्याचे पाहून, खुद्द शाह यांच्या टीमने मुख्यमंत्री शिंदे यांच्या टीमची पाठ थोपटली.

महाराष्ट्र सरकारचा अत्यंत प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने यंदा अप्पासाहेब धर्माधिकारी यांना गौरविले जाणार असून, त्यासाठी नवी मुंबईतील खारघरमध्ये तब्बल पाच ते साडेपाच लाख लोकांच्या उपस्थितीत शाहांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाईल. मात्र, या सोहळ्यासाठी शाह येणार असल्याने राज्य सरकारने विशेषतः मुख्यमंत्री शिंदे यांनी आपली सारी यंत्रणा कामाला लावून, तयारी चालवली आहे.

एकाच वेळी पाच-साडेपाच लाख लोकांनी एकत्र आणून शहांच्या डोळ्यांदेखत शक्तीप्रदर्शनाची व्यवस्थाही केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. हा कार्यक्रम रविवारी होणार आहे. परंतू, राजकीय सभांच्या तुलनेत कैक पट पंचतारांकित सोय केल्याचे नियोजनावरून दिसून येत आहे. त्यात लोकांच्या बसण्यापासून वाहनांची वाहतूक व्यवस्था, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, सुरक्षा यंत्रणेला प्राधान्य दिले आहे.

विशेष म्हणजे, या लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. एवढे लोक, त्यातही शाह आणि डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या कामातील शिस्तबद्धता लक्षात घेऊन पूर्वतयारी करण्यात आली. याआधी राजकीय सभांत गोंधळ उडाला अंदाज पाहता, मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी कार्यक्रमाच्या नियोजनात स्वत: लक्ष घातले. शाह यांच्या उपस्थितीतील प्रत्येक कार्यक्रम हा मुख्यमंत्री शिंदे यांची कसोटी पाहणारा ठरतो. त्यामुळेच पुरस्कार वितरणाच्या सोहळ्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वत: लक्ष घातले आहे.

या कार्यक्रमांच्या तयारीवर मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेही विशेष लक्ष ठेवून आहेत. केंद्रीय गृहमंत्री असल्याने दिल्लीतील टीमही सतत पाहणी करीत आहेत. या टीमने कार्यक्रमाच्या तयारीवर आदल्यादिवशी म्हणजे, शनिवारी शेवटचा हात फिरवला आणि नियोजन पाहून केंद्राची टीम चक्रावली. त्यात मुख्यमंत्र्यांच्या टिमधील सचिन जोशी आणि राहुल गेठेंनी केलेल्या नियोजामुळे अमित शाह यांच्या टीमनेही समाधाव व्यक्त करत त्यांचे कौतुकही केले आहे.

अशी आहे सोय

पाच लाख लोकांच्या बसण्याची सोय

२५० पाण्याचे टँकर,

५५० डॉक्टर, नर्स,

१०० अॅम्ब्युलन्स

८ हेलिपॅड

१८ हजार बस

१ ५ हजार ४४४ कार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT