Chandrakant Patil News : कसब्यातील प्रयोग इतरत्र यशस्वी होऊ देऊ नका : चंद्रकांत पाटलांचा भाजप कार्यकर्त्यांना सल्ला

भाजपच्या वाढत्या सामर्थ्याला घाबरून महाविकास आघाडीतील तीन्ही पक्ष एकत्र येणार आहेत, हे गृहित धरून आत्तापासून सुक्ष्म नियोजन करावे.
Chandrakant Patil
Chandrakant PatilSarkarnama
Published on
Updated on

शिरूर (जि. पुणे) : भाजपबद्दलची (BJP) भीती हेच शिवसेना (shivsenaउद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी कॉंग्रेस (ncp) आणि कॉंग्रेस (Congress) या पक्षांना एकत्र ठेवणारे फेव्हिकॉल आहे. कसबा मतदार संघात ते यशस्वी झाले असले तरी भविष्यातील राजकारणात त्यांचा हा प्रयोग यशस्वी होणार नाही, याची खूणगाठ मनाशी बांधा, असा सल्ला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला. (Don't let the successful experiment in Kasba succeed elsewhere : Chandrakant Patil)

शिरूर तालुका भाजपच्या वतीने न्हावरे फाटा (ता. शिरूर) येथील निसर्ग मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या भाजप कार्यकर्ता मेळाव्यात पाटील बोलत होते. या वेळी प्रवीण फडतरे व बापूसाहेब भुजबळ यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला. ते म्हणाले की, आगामी लोकसभा, विधानसभेपासून जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिका व बाजार समिती या सर्वच निवडणूकांत भाजपच्या वाढत्या सामर्थ्याला घाबरून महाविकास आघाडीतील तीन्ही पक्ष एकत्र येणार आहेत, हे गृहित धरून आत्तापासून सुक्ष्म नियोजन करावे.

Chandrakant Patil
Kolhapur News : मुश्रीफ ईडीच्या फेऱ्यात, तर बंटी पाटील ‘राजाराम’मध्ये; कोल्हापूर बाजार समितीच्या निवडणुकीला रंगत येईना

पक्षीय विचारधारा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व हे शिरोधार्य तर आहेच. पण केंद्र व राज्यात असलेल्या सत्तेच्या माध्यमातून समाजापर्यंत ठोकून विकासाची कामे आणा आणि सामान्य लोकांना पक्षाशी जोडून विकासकामांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाची 'व्होटबॅंक' मजबूत करा", असे आवाहनही त्यांनी केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसला ओपन चॅलेंज आणि पवारांच्या राजकारणाविरोधात थेट तोफा डागत पालकमंत्री चंद्रकांत पाटील मैदानात उतरल्यानेच त्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केले जाते. अशा स्थितीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांतदादांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहून विरोधकांच्या आरोपांना जशास तसे उत्तर द्यावे. विरोधकांनी चंद्रकांतदादांची कितीही बदनामी केली आणि त्यांच्याविरोधात आंदोलने केली तरी त्यांच्या आरोपांनी दादा थांबणार नाहीत किंवा विचलित होणार नाहीत, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांंनी स्पष्ट केले.

Chandrakant Patil
Nilesh Lanke's Warning : ‘मला मागचा नीलेश लंके व्हायला लावू नका’ : आमदार लंकेंनी कोणाला दिला इशारा...

विधानसभेच्या २०२४ च्या निवडणूकीत शिरूरमधून भाजपचा आमदार होईल, पण त्यासाठी पक्षाची ध्येयधोरणे, विचारधारा, सरकारचे काम, जनकल्याणकारी योजना तळागाळापर्यंत घेऊन जाव्या लागतील, असेही जिल्हा संघटन सरचिटणीस ॲड. धर्मेंद्र खांडरे यांनी स्पष्ट केले.

Chandrakant Patil
Nilesh Lanke News : होय, ईडीवाले माझ्याकडे आले आणि येडे होऊन गेले : ईडी चौकशीच्या चर्चेवर नीलेश लंकेंचे भाष्य

या वेळी माजी मंत्री बाळा भेगडे, जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब सातव, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य राहुल पाचर्णे, माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पलांडे, भाजप कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गणेश ताठे, जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे, भाजप अल्पसंख्यांक आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा रेश्मा शेख, जिल्हाध्यक्ष राजूभाई शेख, भाजप महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा वैजयंती चव्हाण, शहर अध्यक्षा रश्मी क्षीरसागर; तसेच आबासाहेब सरोदे, राजेंद्र गदादे व विक्रम पाचुंदकर हे उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com