Vasai Virar News Sarkarnama
मुंबई

Vasai Virar News : वसई विरार महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी संजय हेरवाडे यांची नियुक्ती

सरकारनामा ब्यूरो

संदीप पंडित-

Vasai Virar News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसई विरार महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त आणि सहा उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर राज्य सरकारने महापालिकेत संजय हेरवाडे यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. याआधीही हेरवाडे यांनी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी काम केले होते. त्यांच्यासोबत दीपक झिंझाड, गणेश शेटे, प्रियंका राजपूत, अर्चना दिवे यांची उपायुक्तपदी निवड करण्यात आली आहे. विजयकुमार म्हसाळ यांची पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

वसई विरार महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झालेल्या तत्कालीन उपायुक्त किशोर गवस यांची उल्हासनगर महापालिकेत उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कृषी आणि पशुसंवर्धन विभागातील पशुधन विकास अधिकारी असलेले किशोर गवस यांची मार्चच्या पहिल्या आठवड्यात अतिरिक्त आयुक्तपदी वर्णी लागल्यानंतर वसई विरार महापालिकेतच नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, अवघ्या आठवडाभरातच त्यांची उचलबांगडी झाली होती. आता त्यांची उल्हासनगर महापालिकेत उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वसई विरार (Vasai Virar) महापालिकेतील उपायुक्त पंकज पाटील आणि तानाजी नरळे यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेत सहायक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर डॉ. विजय द्वासे यांची नागपूर महापालिकेत सहायक आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. चारुशिला पंडीत यांची लातूर, तर नयना ससाणे यांची भिवंडी-निजामपूर महापालिकेत उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मीरा भाईंदर (Mira Bhaindar) महापालिकेतील उपायुक्त मारुती गायकवाड यांची पनवेल महापालिकेत उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर सचिन बांगर यांची मीरा भाईंदर महापालिकेत नियुक्ती झाली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT