Pimpri Chinchwad News : बारामतीत अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा या महायुतीच्या उमेदवार असतील, हे जवळपास नक्की झाले आहे.त्यामुळेच त्या सध्या पायाला भिंगरी लावल्यागत मतदारसंघात फिरत आहेत. तर,त्यांच्या प्रतिस्पर्धी अजितदादांच्या चुलत बहिण सुप्रिया सुळे या आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार आहेत. त्यांना बहुतांश पवार कुटुंबाची साथ आहे. त्यामुळे ते सुनेत्रा पवार तथा अजितदादांच्या विरोधात गेले आहेत. त्यात त्यांचे सख्खे भाऊ,वहिनी,पुतण्य़ाही आहे. तोच भावकीचा संदर्भ त्यांनी मंचरच्या मेळाव्यात दिला.
मंचर येथील पक्ष कार्यकर्ता मेळाव्यात मंगळवारी (ता.२६) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर तुफान हल्ला चढविला. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेसारखी लोकसभेची निवडणूक ही गावकी,भावकीची नसते, तरीही त्याचा अनुभव स्वत घेत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यांचा रोख हा बारामती मतदारसंघाकडे होता.
शिरुरमधून तीनवेळा विजयी झालेले आणि ज्यांचा पराभव करताना तोंडाला फेस आला,ज्यांना रेटता आले नाही, असे शिवाजीराव आढळराव (Shivajirao Aadhalrao Patil) हे आता आपले उमेदवार असल्याने त्यांना विजयी करायचे आहे,असे अजितदादांनी यावेळी कार्यकर्त्यांना आवाहन केले. एकतर्फी मतदान झाले पाहिजे. बुथनिहाय मतदान झाले पाहिजे,त्यासाठी भावकी बरोबर आहे का,हे बघा असा सल्ला त्यांनी दिला. कारण तिचा अनुभव स्वत घेत आहे,असे ते म्हणाले.
मावळ लोकसभेवर युतीतील तिन्ही पक्षांनी दावा ठोकल्याने तेथील त्यांचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. मात्र,तेथे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांचे तिकीट जवळपास नक्की आहे. फक्त त्यांच्या नावाची घोषणाच काय ती बाकी आहे. 28 तारखेला ती होणार आहे. ते मावळात,तर बारामतीत राष्ट्रवादी लढेल,असे अजितदादांनी सोमवारी मंचरला सूचित केले.
कारण तेथे कार्यकर्त्यांना त्यांनी मावळ आणि बारामतीतील आपल्या नातेवाईकांना धनुष्यबाण आणि घड्याळाचे बटण दाबण्याचे आवाहन केले. त्यातून मावळची जागा शिवसेनेला,तर बारामती राष्ट्रवादीला सुटणार हे स्पष्ट झाले.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.