Arjun Khotkar News
Arjun Khotkar News Sarkarnama
मुंबई

संकट असेल तर कोणीही सेफ होण्याचा प्रयत्न करेल; अर्जून खोतकरांचे सूचक वक्तव्य

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सोमवारी सहज योगायोगाने भेट झाली होती. त्यावेळी तिथे भाजपचे (BJP) केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचीही भेट झाली. त्यावेळी त्यांनी मला चहाचे निमंत्रण दिले होते. त्यामुळे दानवे यांच्या घरी आलो असल्याचे मत शिवसेनेचे नेते अर्जून खोतकर (Arjun Khotkar) यांनी व्यक्त केले.

खोतकर हे गेल्या दोन दिवसापासून दिल्लीत आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतल्यानंतर खोतकर हे शिंदे गटात सामील झाल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. यावर बोलताना खोतकर म्हणाले, संकट असेल तर कोणीही सेफ होण्याचा प्रयत्न करेल, असे सुचक वक्तव्य त्यांनी केले. तसेच मी जालन्यात गेल्यावर माझी भूमिका स्पष्ट करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

माझ्यावर काही संकट असतील तर चेहऱ्यावर तणाव दिसू शकतो असेही खोतकर म्हणाले. संकट असेल तर कोणाही व्यक्ती सेफ होण्याचा प्रयत्न करेलच. नाही त्या गोष्टींमध्ये जर अडचणी निर्माण केल्या जात असतील तर तणाव दिसणार, असेही त्यांनी सांगितले. माझ्या निर्णयावर सविस्तर बोलणार आहे. उद्धव ठाकरे हे जर काही बोलत असतील तर त्यांचा तो अधिकार आहे. माझ्या चेहऱ्यावर तणाव का आहे याची कारणे सर्वांनी माहित असल्याचे देखील खोतकर म्हणाले.

रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यामध्ये आज दिल्लीत तब्बल दोन तास चर्चा झाली. सलग दुसऱ्या दिवशी या दोघांमध्ये चर्चा झाल्याने खोतकर नेमकी काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. मात्र, आपण जालन्यात जाऊन भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले. खोतकर यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. त्यांची मालमत्ताही ईडीने जप्त केली आहे. त्यामुळे खोतकर शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सुरु आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT