धनुष्यबाण कोणाचा? शिवसेनेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी घेण्यास तयार

Supreme Court| Shivsena| निवडणूक आयोगाच्या नोटिशीविरोधात शिवसेनेच्या वकीलांनी सोमवारी (25 जुलै) ही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली
Supreme Court| Shivsena|
Supreme Court| Shivsena|
Published on
Updated on

शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटाला राज्य निवडणूक आयोगाने पक्ष चिन्हाबाबत पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले. शिवसेना आणि ठाकरे गटाला आपले म्हणणे मांडण्यासाठी 8 ऑगस्टपर्यंत मुदत दिली. त्यानंतर आता निवडणूक आयोगाच्या नोटिशीविरोधात शिवसेनेच्या वकीलांनी सोमवारी (25 जुलै) ही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. या याचिकेवर न्यायालय 1 ऑगस्ट रोजी सुनावणी घेणार आहे.

आयोगानं दिलेल्या नोटीशीवर न्यायालयाने स्थगिती देण्याची विनंती याचिका शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल केली जाणार आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे (Election Commission) धाव घेत शिवसेनेच्या धनुष्यबाणावरच दावा केला. यानंतर आता शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणाकडे राहणार असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. पण त्याआधीच निवडणूक आयोगाच्या या नोटीशीला स्थगिती देण्याची विनंती शिवसेनेने न्यायालयाकडे केली आहे. आज सकाळी शिवसेना न्यायालयात ही बाब नमूद करणार आहे.

Supreme Court| Shivsena|
शिवसेना आक्रमक; निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव

शिवसेना आणि शिंदे गटाच्या संघर्षामुळे शिवसेना कोणाची? शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण हे कोणाचं? अशी लढाई आता निवडणूक आयोगासमोर सुरू झाली आहे. त्यामुळे आत शिवसेना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची की, उद्धव ठाकरेंची? हा निर्णय निवडणूक आयोग करणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने शिवसेना आणि शिंदे गटाला कागदोपत्री पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. 8 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत निवडणूक आयोगाकडून दोन्ही बाजूंना आपलं म्हणणं मांडण्याची मुदत देण्यात आली आहे. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर निवडणूक आयोग सुनावणी करणार आहे.

पण त्याआधी आज शिवसेनेचे वकील निवडणूक आयोगाच्या नोटिशीविरोधात काल (२५ जुलै) शिवसेनेचे वकील न्यायालयात याचिका दाखल करतील. आयोगाच्या या नोटिशीला स्थगिती देण्याची मागणी यात करण्यात येईल. तसेच या सर्व प्रलंबित प्रकरणांवरही न्यायालयानेे निर्णय घ्यावा, अशी विनंती शिवसेनेच्या वतीने करण्यात येणार आहे. त्यामुळे न्यायालय या सर्व प्रकरणावर काय निर्णय घेणार, हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com