Pakistan espionage case Sarkarnama
मुंबई

Pakistan espionage case : पाकिस्तानसाठी हेरगिरी, ठाण्यातील अभियंत्याला अटक; नौदलातील प्रतिबंधित नौकांची माहिती पुरवल्याचा संशय

Engineer Ravi Varma Arrested for Suspected Espionage for Pakistan Thane & Mumbai ATS Investigate : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या संशयावरून ठाण्यातील 27 वर्षीय युवकाला ठाणे दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली.

Pradeep Pendhare

Mumbai ATS investigation : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या संशयावरून ठाण्यातील 27 वर्षीय युवक अभियंता रविकुमार वर्मा याला ठाणे दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली. ठाण्यातील कळवा इथं राहणारा आहे. तो मुंबईतील एका खासगी डिफेन्स टेक्नॉलॉजी कंपनीत कामाला आहे.

ठाणे न्यायालयाने त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिला होता. या चौकशीत रवीने नौदलातील प्रतिबंधित असलेल्या 14 नौकांपैकी काही नौकांची माहिती दिल्याची बाब पुढे आली आहे. रवी वर्मा याचा ताबा आता मुंबई एटीएसकडे देण्यात आला आहे.

अभियंता असलेला रवी पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्हच्या (पीआयओ) संपर्कामध्ये असून, त्याने भारत सरकारने प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रातील गोपनीय व संवेदनशील माहिती पुरवल्याचा संशय आहे. दहशतवाद (Terrorist) विरोधी पथकाला (मुंबई) तशी गोपनीय माहिती मिळाली होती. रवी याला त्यानुसार ताब्यात घेण्यात आलं.

रवीची नोव्हेंबर 2024मध्ये फेसबुकद्वारे एका पीआयओसोबत ओळख झाली. तेव्हापासून म्हणजे नोव्हेंबर 2024 ते मार्च 2025 या कालावधीत त्याने पीआयओला वॉटस्ॲपद्वारे भारत सरकारने (Government of India) प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रातील गोपनीय माहिती वेळोवेळी पुरविली. त्यानुसार त्याला आणि त्याच्या संपर्कातील इतर दोन व्यक्ती, अशा एकूण तिघांविरोधात दहशतवाद विरोधी पथकाने गुन्हा दाखल केला आहे.

रवी वर्मा भारतीय नौदलाची गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवत असल्याचा संशय आहे. त्यामोबदल्यात पाकिस्तानातून मोठी रक्कमही त्याच्या बँक खात्यात जमा झाली आहे. रवीने नौदलातील प्रतिबंधित असलेल्या 14 नौकांपैकी काही नौकांची माहिती दिल्याची बाब पुढे आली आहे, मात्र याबाबत संबंधित विभागाकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

पाककडून मोठी रक्कम

नौदलातील प्रतिबंधित 14 नौकांपैकी काही नौकांची माहिती रवीने दिल्याचे पुढे आले आहे. हरप्रीत आणि पायल शर्मा नावाच्या फेसबुक खात्याच्या माध्यमातून तो पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होता. मात्र याबाबत अद्यापही संबंधित विभागामार्फत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

रवीच्या आईचे पंतप्रधानांना साकडे

सोशल मीडियामुळे युवापिढी बरबाद झाली अशून, त्यावर बंदी घालावी, अशी मागणी रवी वर्मा याच्या आईने केली आहे. फेसबुकमुळे रवी सहा महिन्यांपासून त्रस्त होता. रवीला क्षयरोग असून त्याच्या मोठ्या भावाचा कर्करोगाने मृत्यू झाल्याचेही त्यांनी सांगितले. ‘माझा मुलगा निर्दोष असून, त्याच्या सुटकेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र सरकारने मदत करावी,’ अशी मागणी त्याच्या आईने केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT