Shashi Tharoor News : पहलगाम हल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर'द्वारे पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डे नष्ट केले. त्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला. दरम्यान, भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली. मात्र, भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर काही देशांनी पाकिस्तानला पाठींबा दिला होता. भारताने सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवत जगाला पाकिस्तान पोसत असलेल्या दहशतवादाविषयी माहिती दिली.
खासदार शशी थरूर यांच्या शिष्टमंडळाला मोठे यश आले असून पाकिस्तानला पाठीबा देणाऱ्या देशाने माघार घेतली आहे. कोलंबिया देशाने पाकिस्तानला पाठींबा दिला होता. मात्र, शशी थरूर यांच्या रणनीतीमुळे पाकिस्तानबद्दल सहानुभूती व्यक्त करणारा कोलंबिया आज भारताच्या बाजूने उभा राहिलेला आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना शशी थरुर म्हणाले, "कोलंबियाच्या उपविदेशमंत्री रोजा योलांडा यांनी पाकिस्तानसंबंधी व्यक्त केलेली सहानुभूती मागे घेतली आहे. कोलंबिया आता या प्रकरणात भारताच्या भूमिकेची पूर्णपणे जाणीव ठेवून पुढे जात आहे. हे भारतासाठी महत्त्वपूर्ण यश आहे.
भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे दहशतवादी तळ नष्ट केल्यानंतर कोलंबियाने जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केले होते. मात्र, शशी थरुर यांनी सांगितले की, "आम्ही आमच्या कोलंबियन मित्रांना सांगू इच्छितो की, जे दहशतवाद पसरवतात आणि जे त्याचा प्रतिकार करतात त्यांच्यात कोणतीही तुलना होऊ शकत नाही. जे हल्ला करतात आणि जे संरक्षण करतात, त्यांच्यात फरक असतो. आम्ही केवळ आत्मसंरक्षणाच्या अधिकाराचा वापर करत आहोत आणि जर याबाबत कोणतीही गैरसमजूत असेल, तर ती स्पष्ट करण्यासाठी आम्ही तयार आहोत.
भारताचा मित्र मानला जाणाऱ्या रशियासोबत पाकिस्तानने तब्बल 22 हजार कोटींचा करार केल्याचा दावा पाकिस्तानी माध्यमांनी केला आहे. लष्करी आणि तांत्रिक मदतीच्या सहकार्यसाठी हा करार करण्यात आल्याचे मिडियारिपोर्टमध्ये म्हटले आहे. या करारामुळे पाकिस्तानातील उद्योगांना चालना मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. रशियाकडून अजून या कराराची अधिकृतपुष्टी करण्यात आलेली नाही. जर हा करार झाला असेल तर तो भारताला मोठा धक्का मानला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.