Sambhaji Bhide Controversy  Sarkarnama
मुंबई

Sambhaji Bhide Controversial Statement : संभाजी भिडेंना अटक करा, विरोधक आक्रमक; वादग्रस्त वक्तव्य भोवणार?

Sambhaji Bhide Controversial Statement on Mahatma Gandhi: "संभाजी भिडे अमरावतीमध्ये आले तर त्यांना बरोबर उत्तर देवू."

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने अधिवेळनात गदारोळ झाला. यावरून प्रचंड आकक्रमक होत विरोधकांनी भिडेंच्या अटकेची मागणी लावून धरली. त्यात काँग्रेस नेते आघाडीवर राहिल्याचे दिसून आले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भिडे यांची अटकेची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली, तर माजी मंत्री यशोमती ठाकूरही या मुद्द्यावर आक्रमक झाल्याचे दिसून आले.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “संभाजी भिडे याने महात्मा गांधीबाबत अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या अशा व्यक्तीला अटक करून, त्यांच्यावर कलम १५३ अंतर्गत कारवाई केली गेली पाहिजे. भिडे मागील अनेक वर्षांपासून समाजात तेढ निर्माण करण्याचा काम करत आहेत."

याबाबत काँग्रेसच्या आमदार, माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनीही भिंडेंच्या अटकेटची मागणी केली आहे. ठाकूर म्हणाल्या, ठसमाजात अशांतता तयार करण्याचं काम संभाजी भिडे का करत आहेत. अशी वक्तव्य करूनही त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही? संभाजी भिडे यांना एवढी मुभा का आहे? यापुढे जर संभाजी भिडे अमरावतीमध्ये आले तर त्यांना बरोबर उत्तर देवू."

काय म्हणाले होते संभाजी भिडे?

"मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे अपत्य होते. करमचंद एका मुस्लीम जमीनदाराकडे कामासाठी होते, त्याच जमीनदाराची पैसे घेऊन ते पळून गेले. त्यामुळे चिडून गेलेल्या त्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीला पळवून आणलं, त्यांना घरी आणून त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नाहीत. त्यांचे वडील मुस्लीम जमीनदार आहेत," असे अत्यंत वादग्रस्त विधान भिडेंनी केला होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT