Sambhaji Bhide
Sambhaji BhideSarkarnama

Bhide Guruji News: भिडे गुरुजींच्या धारकऱ्यांनी फिरविल्या नंग्या तलवारी; तरी पोलीस शांतच

Sambhaji Bhide: जुन्नर येथील गडकोट मोहीमेतील प्रकार, स्मारकाबाबतही केलं आक्षेपार्ह विधान
Published on

Junnar News : पंढरपूरच्या वारीआणि पुण्यात संभाजी भिडे गुरुजींचे (Sambhaji Bhide) धारकरी तलवारी घेऊन घुसल्याने यापूर्वी मोठा वाद झाला होता. आता तो पुन्हा त्यांच्याच बाबतीत व तलवारीवरूनच वाद निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. जुन्नर येथे बुधवारी पार पडलेल्या गडकोट मोहीमेतील मिरवणुकीत त्यांच्या धारकऱ्यांनी तलवारी फिरवल्या आहेत.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजींच्या (Bhide Guruji) कालच्या धारातीर्थ गडकोट मोहिम २०२३ ची सांगता झाली. यावेळी काढलेल्या मिरवणुकीत जुन्नर (Junnar) येथे त्यांच्या धारकऱ्यांनी नंग्या तलवारी नाचविल्याने पुन्हा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे 'टिकली' प्रकरणानंतर या प्रकरणावरूनही भिडेगुरुजी चर्चेत आले आहेत.वाद आणि भिडेगुरुजी हे समीकरणही त्यातून कायम राहिले आहे.

Sambhaji Bhide
Shivaji Maharaj Statue in Mumbai : संभाजी भिडेंचा शिवस्मारकाला विरोध; म्हणाले...

दरम्यान या मोहिमेत त्यांनी आरबी समुद्रातील स्मारक (Shivaji Maharaj Statue) उभारण्यास विरोध केला. ते म्हणाले, "राज्यात नको इतके पुतळे आहेत. आता अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारलं जात आहे. त्या स्मारकाचा आणि छत्रपती शिवरायांच्या आयुष्याचा काहीच संबंध नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून हे स्मारक उभारण्याचा बेशरमपणा करू नये", असे नवे आक्षेपार्ह विधान करून पुन्हा आणखी एक वाद त्यांनी ओढवून घेतला.

गडकोटांचे संवर्धन आण शिवाजीमहाराजांचा इतिहास लोकांपर्यत पोहचवा या उद्देशाने आखलेल्या गडकोट मोहीमेतच भिडे गुरुजींनी शिवरायांच्या स्मारकावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यामुळं शिवप्रेमींमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.

Sambhaji Bhide
Marathwada Teacher Constituency Result : बंडखोर सोळुंके, कुलकर्णी यांना पक्षाने आणि मतदारांनीही जागा दाखवली..

ही मोहीम भिमाशंकर (Bhimshankar) ते शिवनेरी (Shivneri) अशी २८ ते ३१ जानेवारी या दरम्यान पार पडली. त्यानंतर या मोहीमेचा बुधवारी (ता. १) जुन्नरमधील सांगता झाली. यावेळी साताऱ्याचे भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale) आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांनी आवर्जून हजेरी लावली होती. तसेच ३५ ते ४० हजार धारकरी तलवारी घेऊन यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, तलवारीने केक कापला वा तलवार किंवा कोयता डीपीवर ठेवला तरी गुन्हा नोंदवून कारवाई केली जाते. जुन्नरमधील मोहीमेत नंग्या तलवारी जाहीरपणे नाचवूनही पोलीस सध्या शांतच आहेत. भिडेगुरुजी हे राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या निकटचे समजले जाते. त्यामुळे त्यांच्याविरुद्धही पोलिस कारवाई होण्याची सुतराम शक्यता नाही. पण, सामान्य जनतेला एक न्याय व त्यांना दुसरा, याबद्दल समाजात नाराजीचा सूर उमटला आहे.

एखाद्या कार्यक्रमात तलवार भेट दिल्यानंतर ती म्यानातून तलवार उपसली, तरी शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई केली जाते. त्यामुळे कालच्या मिरवणुकीत तलवारी फिरविल्यावरही ती केली जावी, अशी चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com