Uddhav Thackeray Speech : Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray Speech : कलाकृतींचं प्रदर्शन करतो, विकत घ्यायला या; शिंदे-भाजपवर 'ठाकरी' प्रहार

Uddhav Thackeray Speech : "...म्हणून मी थोडाकाळ फोटोग्राफी थांबवली."

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नवी मुंबईतील एका चित्रप्रदर्शनाला उपस्थिती लावली. या प्रसंगी बोलत असताना त्यांनी अप्रत्यक्षपणे राजकीय टीका केली. नवे राजकीय समीकरण आणि राज्यातील तीन पक्षांच्या सरकारवरही खोचकपणे भाष्य केले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप यांचं नाव न घेताच त्यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली. (Latest Marathi News)

उद्धव ठाकरे म्हणाले, "सध्या जे काही चाललेलं आहे, त्याचा ताळमेळ लागत नाही. कुणाचा फोटो कुणाबरोबर येईल हे सांगता येत नाही. फोटोमधला कधी कुणी गायब होईल, हे ही सांगता येत नाही, म्हणून मी थोडाकाळ फोटोग्राफी थांबवली," अशा शब्दात त्यांनी अप्रत्यक्ष शिंदे-फडणवीस-पवार खोचक टीका केली आहे.

ठाकरे म्हणाले, "माझ्या नावआधी एक्स मुख्यमंत्री असा उल्लेख केला आहे. ठिक आहे. पण मी कधीच एक्स फोटोग्राफर होणार नाही. कलेचा वारसा मला माझ्या वडीलांकडून लाभला. पूर्वी माझी एक मुलाखत झाली होती. त्यात मला प्रश्न विचारला गेला की, 'तुमचे वडिल बाळासाहेब ठाकरे राजकारणी आहेत. तसेच ते उत्तम व्यंगचित्रकार आहेत. तुमच्या वडीलांकडून कोणताही एक वारसा घ्यायचा झाला तर कोणता घ्याल? मी क्षणाचाही विलंब न करता सांगितलं की, कलेचा वारसा घेणार. मी हे एवढ्यासाठी म्हणतोय की, कला ही रक्तात असावी लागते."

"आपण कलाकृती विकत घेऊ शकतो. पण कला विकली जाऊ शकत नाही. पण आमच्याकडून आमच्या काही कलाकृती काही जणांनी विकत घेतली हे खरं आहे. पण याचा प्रश्न मला पडलेला नाही, आणखी कलाकृती तयार करू. पाहिजे तर प्रदर्शन करतो आणि सांगतो की कोणाला विकत घ्यायचा असेल तर या," असे ठाकरे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT