Arvind Sawant Sarkarnama
मुंबई

'घराबाहेर पडलेल्यांना घरावर कसा हक्क सांगता येईल?'

खरी शिवसेना (Shiv Sena) कुणाची याचा वाद सध्या निवडणूक आयोगासमोर सुरु आहे.

सरकारनामा ब्यूरो

Arvind Sawant News : खरी शिवसेना (Shiv Sena) कुणाची याचा वाद सध्या निवडणूक आयोगासमोर सुरु आहे. शिवसेनेच्या वतीने सचिव अनिल देसाई (Anil Desai) यांनी सर्व प्रतिज्ञापत्र आयोगासमोर सादर केली आहेत. यानंतर शिवसेना खासदार अरविंद सांवत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी 'घराबाहेर पडलेल्यांना घरावर हक्क सांगता येईल का? असा सवाल सावंत (Arvind Sawant) केला आहे.

सावंत म्हणाले, निवडणूक आयोगाकडे देसाई यांनी सर्व प्रतिज्ञापत्र सादर केली. आम्ही सादर केलेल्या सर्व प्रति या सत्य आहे. शिवसेना कुणाची तर ती शिवसैनिकांची आहे. आमदार, खासदार कोण, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांनी निवडून दिले म्हणून आम्ही निवडून आलो आहोत. पक्ष पहिला आहे. पक्षाला ते चिन्ह मिळालेले आहे.

म्हणून आम्हाला निवडणुकीसाठी ते चिन्ह देण्यात येते. शिवसेना हा नोंदणीकृत पक्ष आहे. त्यामुळे मान्यता प्राप्त पक्षात जी निवड होते, ती पक्ष प्रमुख करतात, असेही त्यांनी सांगितले. नुकतीच राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली होती. त्यात 2023 पर्यंत पक्ष प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी निवड करण्यात आली आहे.

त्यामुळे हे कोण? असा सवाल सावंतांनी केला. घराबाहेर पडलेल्यांना घरावर हक्क कसा काय दाखवता येऊ शकतो, असा तिखट सवाल त्यांनी केला. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात लिहिलेले कलम 10 हे जाणीवपूर्वक झाकण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला. पक्षांतर बंदींचा कायदाच त्यासाठी बनवण्यात आला आहे.

मात्र, हाच कायदा पायदळी तुडवला जात, असल्याचेही त्यांनी सांगितले. कायदा कसा झुकवला जातोय, संस्थांचा वापर कसा होतो आहे हे सगळे जनता पाहत आहे. निवडणूक आयोगाने 24 तासही दिलेले नाहीत, असेही सामंत यांनी सांगितेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT